मिथुन चक्रवर्तीला भेटले मोहन भागवत; भाजपमध्ये जाण्याची चर्चा...

भाजपला पश्चिम बंगालमध्ये प्रसिध्द चेहरा हवा असल्याने ही भेट महत्वाची मानली जात आहे.
RSS Cheif Mohan Bhagwat meets Actor Mithun Chakraborty in mumbai
RSS Cheif Mohan Bhagwat meets Actor Mithun Chakraborty in mumbai

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये सत्ता आणण्यासाठी भाजपकडून जोर लावण्यात आला आहे. राज्यात सध्या भाजपने परिवर्तन यात्राही काढली आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) चे प्रमुख मोहन भागवत यांनी मंगळवारी अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतली. भाजपला पश्चिम बंगालमध्ये प्रसिध्द चेहरा हवा असल्याने ही भेट महत्वाची मानली जात आहे. 

आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगले तापले आहे. भाजपने आगामी विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली असून तृणमूल काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे केले आहे. तृणमूलचे डझनभर आमदार फोडून भाजपने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जेरीस आणले आहे. पण निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी भाजपकडून प्रसिध्द स्थानिक चेहरा शोधला जात आहे. 

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे सुत्रांनी सांगितले. यापार्श्वभूमीवर आज मोहन भागवत मिथुन चक्रवर्ती यांच्या घरी जाऊन भेटले. सुमारे तासभर दोघांची चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीवरून पश्चिम बंगालमधील राजकारण तापण्यास सुरूवात झाली आहे. मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये गेल्यास पक्षासाठी त्यांचा मोठा फायदा होणार असल्याचे मानले जात आहे. 

बंगालमधील निवडणुकीमुळे या भेटीला महत्व आले आहे. मिथुन चक्रवर्ती यांनी मात्र ही भेट राजकीय नसल्याचे स्पष्ट केले आहे. आम्ही अनेकदा भेटलो असूनही आजच्या भेटीतही कोणती राजकीय चर्चा झाली नाही, असे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माँ किचनची घोषणा केली आहे. या किचनमध्ये लोकांना केवळ पाच रुपयांत जेवणाची थाळी मिळणार आहे. कर्नाटकमधील इंदिरा कँटीन आणि तमिळनाडूतील अम्मा कँटीनप्रमाणेच या किचनची योजना करण्यात आली आहे. भाजपने या किचनच्या घोषणेवर टीका केली आहे. निवडणुकांमुळे ही स्टंटबाजी केल्याचा आरोप भाजपने केला आहे. 

ममता बॅनर्जी यांनी गरीबांसाठी आणलेली ही तिसरी योजना आहे. यापूर्वीही त्यांनी सरकार आपल्या दारी आणि आरोग्य विमा योजना सुरू केल्या आहेत. सोमवारी या योजनांना कोलकतामध्ये सुरूवात करण्यात आली असून संपुर्ण राज्यात त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com