योगींना मोदींसह शहा, नड्डांनी दिल्या नाहीत वाढदिवसाच्या शुभेच्छा? हे आहे कारण... - PM Narendra Modi Didnt Tweet Birthday Wishes For Yogi Adityanath | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

योगींना मोदींसह शहा, नड्डांनी दिल्या नाहीत वाढदिवसाच्या शुभेच्छा? हे आहे कारण...

वृत्तसंस्था
रविवार, 6 जून 2021

योगी आदित्यनाथ यांचा शनिवारी वाढदिवस होता. अनेक भाजपच्या नेत्यांनी योगींना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi adityanath) यांच्या कार्यपध्दतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi यांच्यासह गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) नाराज असल्याच्या चर्चेने राजकारण ढवळून निघाले आहे. योगींविरोधात भाजपच्या काही आमदारांनी उघडपणे असमाधान व्यक्त केले आहे. त्यामुळं योगींना बदलण्याची चर्चाही रंगली होती. त्यातच योगी आदित्यनाथ यांच्या वाढदिवसाला मोदींसह शहा व नड्डांनीही सोशल मीडियावर त्यांना शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यावरून या चर्चेला उधाण आले आहे. ( PM Narendra Modi Didnt Tweet Birthday Wishes For Yogi Adityanath)

योगी आदित्यनाथ यांचा शनिवारी वाढदिवस होता. अनेक भाजपच्या नेत्यांनी योगींना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. पण त्यामध्ये पंतप्रधान मोदी, शहा, नड्डा यांचा समावेश नाही. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा वाढदिवस 27 मे रोजी होता. त्यांना नड्डा यांनी ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. यावरून सोशल मीडियावर योगी आदित्यानाथांवर भाजपमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा : दोन महिला आएएसमधील वाद विकोपाला; सरकारकडून दोघींचीही बदली

पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. कोरोना काळामध्ये उत्तर प्रदेशमध्ये योग्यप्रकारे व्यवस्थापन झाले नाही, असा ठपका ठेवला जात आहे. गंगा नदीच्या किनारी पुरण्यात आलेले आणि नदीत सोडण्यात येणाऱ्या मृतदेहांमध्ये योगी सरकारवर टीकेची झोड उठली होती. तसेच मागील चार वर्षांच्या योगींच्या कार्यपध्दतीवर पक्षातील काहींनी उघडपणे नाराजीही व्यक्त केली आहे.  त्यावरून मागील आठवड्यात योगींना बदलण्याची चर्चा सुरू झाली होती. तसेच मंत्रीमंडळातही मोठे बदल केले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत जवळचे असलेले ए. के. शर्मा यांना सरकारमध्ये महत्वाचे पद मिळू शकते, अशीही चर्चा आहे. 

या चर्चेमध्ये योगींच्या वाढदिवशी भर पडली. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील काही दिवसांमध्ये ट्विटरच्या माध्यमातून कोणत्याही नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्या दिलेल्या नाहीत. पंतप्रधान कार्यालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींना योगी आदित्यनाथ यांना दुरध्वनीद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान त्यांना कोणालाही सोशल मीडियातून शुभेच्छा दिलेल्या नाहीत.

अमित शहा यांनीही हीच भूमिका घेतली आहे. त्यांच्या ट्विटरवरूनही मागील काही दिवसांत कोणत्याही नेत्याला शुभेच्छा देण्यात आलेल्या नाहीत. शहा यांच्यासह नड्डांनी दुरध्वनीवर शुभेच्छा दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळं भाजप नेत्यांनी योगी आदित्यनाथांवर नाराजी असल्याची चर्चा फेटाळून लावली आहे. ट्विटरवरून शुभेच्छा न देणं यावरून नाराजी आहे, असे म्हणता येणार नाही, असे एका नेत्याने सांगितले. भाजपचे नेते बी. एल. संतोष यांनीही योगींच्या कोरोना काळातील कामाचे कौतुक करत नाराजी नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख