राष्ट्रवादीला एक मंत्रीपद; पी. विजयन यांनी दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

विधानसभा निवडणुकीत सलग दसुऱ्यांचा विजय मिळवत केरळमध्ये डाव्यांनी सत्ता स्थापन केली आहे.
Pinarayi vijayan sworn in as Chief Minister of Kerala
Pinarayi vijayan sworn in as Chief Minister of Kerala

तिरूअनंतपुरम : विधानसभा निवडणुकीत सलग दसुऱ्यांचा विजय मिळवत केरळमध्ये डाव्यांनी सत्ता स्थापन केली आहे. केरळमधील डाव्यांचा हा ऐतिहासिक विजय ठरला आहे. या विजयानंतर 18 दिवसांनी गुरूवारी पी. विजयन यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या मंत्रीमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसलाही एक मंत्रीपद मिळाले आहे. (Pinarayi vijayan sworn in as Chief Minister of Kerala)

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सेंट्रल स्टेडियममध्ये छोटेखानी कायर्क्रमात राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी पी. विजयन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजयन हे 76 वर्षांचे असून मागील 40 वर्षांत पहिल्यांदाच सलग दुसऱ्यांदा शपथ घेणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. विजयन यांच्यासह 20 आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. कोरोनाचे कारण देत विरोधी पक्षातील नेते या शपथविधी उपस्थित राहिले नाहीत.

विजयन यांच्या मंत्रीमंडळामध्ये दोन मंत्री वगळता सर्व नवीन चेहरे आहेत. दोन दिवसांपूर्वीच कम्युनिस्ट पक्षाने मागील मंत्रीमंडळातील एकाही आमदाराला पुन्हा संधी दिली जाणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज शपथ घेतलेल्या 20 जणांमध्ये डाव्या पक्षातील एकाही जुन्या मंत्र्याचा समावेश नाही. या मंत्रीमंडळात केवळ जेडीएसचे नेते के. कृष्णनकुट्टी आणि राष्ट्रवादीचे नेते ए. के. शशीधरन यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शशीधरन आणि विजयन यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत.

शशिधरन हे मागील सरकारमध्ये जलसंधारण व परिवहन मंत्री होते. केरळमधील राष्ट्रवादीचे ते प्रमुख नेते आहेत. राज्यात राष्ट्रवादीला यावेळी दोन जागा मिळाल्या आहेत. त्यामध्ये शशिधरन यांच्यासह थॅामस के थॅामस यांचा समावेश आहे. मागील काही वर्षांपासून राष्ट्रवादीची केरळमध्ये डाव्यांसोबत आघाडी आहे. 

दरम्यान, विजयन यांच्या मंत्रीमंडळामध्ये तीन महिला आमदारांचाही समावेश करण्यात आला आहे. मागील सरकारमध्ये केवळ दोन महिला मंत्री होत्या. त्यामध्ये आरोग्यमंत्री के. शैलजा यांचा समावेश होता. कोरोना काळात प्रशंसनयी कामगिरी केल्यामुळे त्यांचे केरळसह जगभरात कौतुक झाले आहे. पण या मंत्रीमंडळातून त्यांनाही डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे केरळमध्ये अनेकांनी याबाबत नाराजीही व्यक्त केली आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com