Four BJP Mla oppose Yrdiyurappa govt over plan to sell land
Four BJP Mla oppose Yrdiyurappa govt over plan to sell land

येडियुरप्पांविरोधात भाजपचेच आमदार; जमीन विक्रीवरून घेरलं...

सरकारने घेतलेल्या या निर्णयाला अनेक मंत्री व आमदारांचा विरोध आहे.

बेंगलुरू : कर्नाटकमध्ये सध्या बेल्लारी जिल्ह्यातील ३ हजार ६६७ एकर जमीन विक्रीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. ही जमीन जिंदाल ग्रुपला विकण्याचा निर्णय येडियुरप्पा सरकारने घेतला आहे. त्याला भाजपमधील आमदार, विरोधी पक्षांसह विविध सामाजिक संघटनांनीही जोरदार विरोध केला आहे. विशेष म्हणजे काँग्रेस व जनता दल सत्तेत असताना येडीयुरप्पा यांनीच या व्यवहाराला जोरदार विरोध केला होता. (Four BJP Mla oppose Yediyurappa govt over plan to sell land)

मुख्यंमत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी एप्रिल महिन्यात झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत जमीन विक्रीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या मंजुरीला भाजपच्या चार आमदारांनी विरोध केला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर पत्र लिहिलं आहे. बसवगौडा यतनाळ, अरविंद बेलाड, के. पौर्णिमा आणि उदय गरुडाचार अशी या आमदारांची नावे आहेत. जमीन विक्रीचा निर्णय आमदारांसाठी धक्कादायक आहे. भाजप कार्यकर्ते व आमदारांनी यापूर्वी केलेल्या आंदोलनाची ही एकप्रकारे थट्टा आहे, असे आमदारांनी पत्रात म्हटलं आहे.

सरकारने घेतलेल्या या निर्णयाला अनेक मंत्री व आमदारांचा विरोध आहे. काँग्रेस व जेडीयुची सत्ता असताना भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं होतं. या आंदोलनाची मुख्यमंत्री थट्टा करत असल्याचे तुम्ही या निर्णयावरून दाखवून दिले, अशी थेट टीकाही पत्रात करण्यात आली आहे. 

सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास मोठे नुकसान सहन करावे लागेल. जिंदाल कंपनीला प्रति एकर १.२८ लाख रुपये या दराने जमिनीची विक्री केली जाणार असल्याचे समजते. ही जागा निरुपयोगी नाही. या जमिनीखाली कोट्यवधी रुपयांची खनिजे आहेत, असे पत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे.

पत्राला इतर भाजपच्या आमदारांचा पाठिंबा असल्याचेही समजते. बेंगलुरूमधील वकील एस. दोरेराजू यांनीही मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना जमीन विक्रीवरून कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्यांनी या व्यवहाराला आव्हान दिले आहे. जिंदाल कंपनीली जमीन दिल्यास पर्यावरणाचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com