मोदी-नड्डा यांच्या भेटीनंतर योगी आदित्यनाथ यांचे मुख्यमंत्रीपद कायम.. - up Next election under the leadership of Yogi Adityanath | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

मोदी-नड्डा यांच्या भेटीनंतर योगी आदित्यनाथ यांचे मुख्यमंत्रीपद कायम..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 7 जून 2021

पुढची निवडणूक योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाणार आहे. 

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात कोरोनातील परिस्थिती हाताळण्यास अपयश आल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ Yogi Adityanath यांच्याविरोधात अनेक तक्रारी पक्षांतील काही नेत्यांनी केल्या होत्या. भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात उत्तरप्रदेश भाजप पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर योगी यांना हटविण्यात येईल, अशी चर्चा सुरू होती. up Next election under the leadership of Yogi Adityanath

दिल्लीत नुकतीच राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची RSS बैठक झाली, यात भाजपचे ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. या बैठकीतही या विषयावर चर्चा करण्यात आली होती. भाजपचे सर्वात ताकदवार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ओळखले जातात, पण  त्यांच्या विरोधात भाजपच्याच काही नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी केल्या होत्या.  

गेल्या काही दिवसात भाजपचे मंत्री बी.एल. संतोष यांनी लखनऊ येथे योगी सरकारमधील काही मंत्र्यांची गुप्त बैठक घेतली होती. त्यांच्याकडून उत्तरप्रदेशातील भाजपच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला होता. उत्तरप्रदेश मधील विधानसभा निवडणुकांचे आवाहन भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघासमोर आहे. 
 
या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांना पदावरुन हटविण्याची हालचाली सुरु होत्या. पण याबाबत जे.पी.नड्डा यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या विषयावर चर्चा झाली. यानंतर योगी आदित्यनाथ यांना बदलण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.  पुढची निवडणूक योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

ठाकरेंचा गैरव्यवहार उघड करणार म्हणून गावबंदी..सोमय्यांचा आरोप

कोर्लई (रायगड) : कोलई गावात घराच्या बाहेर पडण्यासाठी तसेच गावात अन्य कोणी येण्यासंबंधात प्रतिबंध लादला गेला आहे.  गावाचा शेवटचा कोरोना रुग्ण बरा होऊन नंतर 28 दिवसपर्यंत हा लॉकडाऊन, गाव बंदी राहिल, असा आदेश अलिबाग प्रशासनाने 3 जूनला काढला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी कोलई गावात खरेदी केलेल्या बंगल्याबाबत माहिती घेण्यासाठी येणार असल्यामुळे गावबंदी केली असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या Kirit Somaiyaयांनी केला आहे.
Edited by : Mangesh Mahale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख