ठाकरेंचा गैरव्यवहार उघड करणार म्हणून गावबंदी..सोमय्यांचा आरोप - BJP leader Kirit Somaiya criticizes Chief Minister Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

ठाकरेंचा गैरव्यवहार उघड करणार म्हणून गावबंदी..सोमय्यांचा आरोप

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 7 जून 2021

सत्येचा राक्षसी उपयोग कोणत्या कायद्याखाली केला, असा सवार सोमय्या यांनी केला आहे. 

कोर्लई (रायगड) : कोलई गावात घराच्या बाहेर पडण्यासाठी तसेच गावात अन्य कोणी येण्यासंबंधात प्रतिबंध लादला गेला आहे.  गावाचा शेवटचा कोरोना रुग्ण बरा होऊन नंतर 28 दिवसपर्यंत हा लॉकडाऊन, गाव बंदी राहिल, असा आदेश अलिबाग प्रशासनाने 3 जूनला काढला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी कोलई गावात खरेदी केलेल्या बंगल्याबाबत माहिती घेण्यासाठी येणार असल्यामुळे गावबंदी केली असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या Kirit Somaiyaयांनी केला आहे. BJP leader Kirit Somaiya criticizes Chief Minister Uddhav Thackeray

1 जूनला किरीट सोमय्या हे कोर्लई ग्रामपंचायत, तहसीलदार, अधिकाऱ्यांना उध्दव ठाकरे / रविंद्र वायकर परिवाराच्या 19 बंगल्याच्या गैरव्यवहाराचा पाठपुरावा करण्यासाठी येणार असे कळविले होते. त्याला  उत्तर  म्हणून किरीट सोमय्या यांना ३ जून रोजी गावबंदी, घरबंदीचा हा आदेश पाठविला. अशा प्रकाराने गावातला एक माणूसपण कोरोनाग्रस्त असेल किंवा 100% गाव कोरोना मुक्त होऊन 28 दिवस उलटणार तो पर्यंत 100% लॉकडाऊन लागू करण्याचा अधिकार कोणत्या कायद्यांतर्गत आहे ? असा प्रश्न त्यांनी विचारला.  

TWITTER : "चिमणी गिधाडांना भारी पडली!..आव्हाडांचा भाजपला टोला.. 

अशा प्रकारची घर, गाव बंदी हे घटनेच्या दृष्टीने गैरकायदेशीर आहे. अशा प्रकारचा आदेश रायगड सोडा महाराष्ट्रात, देशात कुठे लागू करण्यात आला आहे, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले. त्याचे उदाहरण आम्हाला द्यावे. वायकर परिवाराच्या 19 बंगल्यांच्या घोटाळ्या संबंधात येत आहे, म्हणून असा आदेश सरकारने काढला असे मला म्हणायचे नाही. परंतु गावकऱ्यांवर अशा प्रकारचा अत्याचार, सत्येचा राक्षसी उपयोग कोणत्या कायद्याखाली केला, अशा प्रश्न किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला केला आहे. 

कोरोना उपचार याला प्राधान्य देणं ही आमचीही जबाबदारी आहे, परंतु सत्तेचा राक्षसी दुरुपयोग याचा पुनर्विचार व्हावा, लोकडाऊन ७-७ दिवसाचे असतात, असे अनिश्चित लॉकडाऊन फक्त कोर्लाई साठी?  असे ही ते म्हणाले आज किरीट सोमय्या हे आज मुरुड तहसीलदार आणि रायगडच्या मुख्य कार्यकारी अधाकाऱ्यांची कोरोना आणि 19 बंगल्याच्या गैरव्यवहारप्रकरणी भेट घेणार आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख