बोगस लसीकरण शिबीराला खासदारही फसल्या; लस घेतली पण नोंदच नाही

महापालिकेच्या नावाखाली मंगळवारी या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
MP Mimi Chakraborty busted fake corona vaccination camp
MP Mimi Chakraborty busted fake corona vaccination camp

कोलकता : मागील काही दिवसांपासून देशात अनेक ठिकाणी बोगस लसीकरण शिबीरांचे पेव फुटले आहे. नागरिकांना लस दिली दिल्यानंतर कोविन पोर्टलवर त्यांची नोंदच नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळं त्यांना लस घेतल्याचं प्रमाणपत्रही मिळत नाही. याचा फटका एका महिला खासदारालाही बसला आहे. महापालिकेकडून शिबीराचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगत संबंधित महिला खासदाराला लस घेण्यास सांगितली. पण लस घेतल्यानंतर हे शिबीर आयोजित करणाराच बोगस आयएएस अधिकारी निघाल्याने त्यांना धक्का बसला. (MP Mimi Chakraborty busted fake corona vaccination camp)

कोलकता महापालिकेच्या नावाखाली मंगळवारी या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांनी या शिबीरा कोविशिल्ड लशीचा पहिला डोसही घेतला. या शिबीरात त्यांना प्रमुख पाहूणे म्हणून बोलावण्यात आले होते. तृतीयपंथी व दिव्यांगांना लस घेण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी आयोजकांनी मिमी यांनी निमंत्रित केले होते. कोलकता महापालिकेचा उपायुक्त असल्याचे सांगत एकाने त्यांच्याशी संपर्क साधला होता.

मिमी यांच्यासह 200 ते 250 जणांनी या शिबीरात लस घेतली आहे. लस घेण्यासाठी नोंद करताना आधार कार्डची मागणीही करण्यात आली नाही, त्याचवेळी संशय आला होता. त्यामुळं नोंदणीचा संदेश कुणाच्याही मोबाईलवर आला नाही. तसेच लस घेतल्यानंतर काही वेळात प्रमाणपत्र मिळेल, असेही आयोजकांनी सांगितले. पण कुणालाही हे प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे मिमी यांनी या शिबीराबाबत माहिती घेण्यास सुरूवात केली, असे मिमी यांनी सांगितलं. 

महापालिकेकडून असं कोणतंही शिबीर याभागात आयोजित केले नसल्याचे सांगितले. तसेच स्थानिक नगरसेवकांनाही याबाबत माहिती नव्हती. त्यामुळं हे शिबीर बोगस असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर सायंकाळी सहा वाजता ते शिबीराच्या ठिकाणी पोहचले. तिथे आयोजक असलेल्या देबांजन या व्यक्तीने आपण आयएएस अधिकारी असून महापालिकेचे उपायुक्त असल्याचे सांगत ओळखपत्र दाखवलं. पण त्यानंतरही त्यांना अटक करून पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तिथे त्याने आपला गुन्हा कबूल केला. 

देबांजन याच्याकडून अनेक बनावट कागदपत्रे, ओळखपत्र, सरकारी शिक्के, आरोग्य विभागाकडून लस मिळवण्यासाठीचे अर्ज अशी कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. मिमी यांनी प्रमाणपत्र न मिळाल्याने तातडीने पावले उचलल्याने बोगस शिबीराचा पर्दाफाश झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com