राहुल गांधींनंतर प्रियांका गांधीही दक्षिणेतून लढणार? काँग्रेसमध्ये अंतर्गत हालचाली

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सध्या केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
MP Karti Chidambaram demands to party for Priyanka Gandhi Vadra be candidate for Kanyakumari
MP Karti Chidambaram demands to party for Priyanka Gandhi Vadra be candidate for Kanyakumari

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सध्या केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींनाही दक्षिणेत आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी तामिळनाडूतील एका लोकसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. 

राहुल गांधी यांनी 2019 मध्ये उत्तर प्रदेशातील अमेठीसह वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढविली. पण अमेठी मतदारसंघात त्यांना पराभव पत्करावा लागला. वायनाडमध्ये निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी टीकाही केली होती. अमेठीमध्ये पराभव निश्चित असल्याने पळ काढल्याची टीका त्यांच्यावर झाली होती.  गांधी कुटूंबाचा गड समजल्या जाणाऱ्या अमेठीतच राहुल गांधींचा पराभव झाला. वायनाडमधील मतदारांनी मात्र त्यांना स्वीकारले. 

तमिळनाडू, पुद्दुच्चेरी व केरळमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी नुकताच तीनही राज्यांचा दौरा केला आहे. यावेळी त्यांनी उत्तरेकडील राज्यांमधील राजकारणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. राहुल यांच्याकडून उत्तर आणि दक्षिण असा वाद निर्माण केला जात असल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यातच आता प्रियांका गांधी यांनाही दक्षिणेत आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

तमिळनाडूतील कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीबरोबरच या मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. खासदार एच. वसंतकुमार यांचे कोविडमुळे निधन झाल्याने या मतदारसंघात पोट निवडणूक होत आहे. त्यांनी दोन लाखांच्या मताधिक्याने 2019 ची निवडणूक जिंकली होती. याच मतदारसंघातून प्रियांका गांधींना उमेदवारी देण्याची नेत्यांनी केली आहे.

काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम ही मागणी केली आहे. त्यांनी आज पक्षाच्या राज्य निवडणूक समितीकडे याबाबतचा अर्ज दिला आहे. त्यामध्ये त्यांनी प्रियांका गांधी यांना कन्याकुमारी मतदारसंघातून उमेदवारी देण्याची विनंती केली आहे. त्यांच्यासोबत पक्षाचे इतर पदाधिकारीही उपस्थित होते. 

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी या उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. रायबरेलीसह अमेठी हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा. पण भाजपने अमेठीवर कब्जा करत गांधींच्या गडाला सुरूंग लावला. 

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com