राहुल गांधींना धक्का; मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे...

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच राजीनामा सत्र सुरू झाल्याने राहुल गांधींसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
In Rahul Gandhis Wayanad Four Leaders Quit Party Posts
In Rahul Gandhis Wayanad Four Leaders Quit Party Posts

तिरूअनंतपुरम : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना त्यांच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातच धक्का बसला आहे. जवळपास चार वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी पक्षातील विविध पदांचे तडकाफडकी राजीनामे दिले आहेत. त्यातील दोघांनी डाव्या पक्षांत प्रवेश केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच राजीनामा सत्र सुरू झाल्याने राहुल गांधींसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

राहुल गांधी यांनी 2019 मध्ये उत्तर प्रदेशातील अमेठीसह केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. पण अमेठीमध्ये भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला. तर वायनाडमधील मतदारांनी त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले. त्यानंतर त्यांनी वायनाडसह केरळवर विशेष लक्ष राहिले आहे. 

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नुकताच केरळचा दौराही केला आहे. पण त्यांची पाठ फिरताच वायनाडमधील पक्षाच्या चार पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. पक्षामध्ये संघटनात्मक निराशा आणि गटबाजी असल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. 

जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस पीके अनिल कुमार, केरळ प्रदेश काँग्रेसचे प्रदेश सचिव एम एस विश्वनाथन, प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सदस्य केके विश्वनाथन आणि महिला काँग्रेसच्या नेत्या सुजया वेणुगोपाल यांनी राजीनामे दिले आहेत. पक्षाचे नेते के सुधाकरन यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. 

सुधाकरन म्हणाले, वायनाडमधील पक्षाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर राजीनामे देत असल्याच्या बातमीमध्ये तथ्य नाही. पक्षात कोणतीही अडचण नाही. आमच्या दोन नेत्यांनी डाव्या पक्षात प्रवेश केला आहे. तसेच सीपीआय (एम) मधील दोन नेते काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत, असा दावा त्यांनी केला.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com