भाजपचे मंत्री म्हणतात...यज्ञात आहुती द्या, कोरोनाची तिसरी लाट येणार नाही!

सप्टेंबर किंवा अॅाक्टोबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
MP BJP Ministers controversial statement over corona crisis
MP BJP Ministers controversial statement over corona crisis

भोपाळ : देशात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरली असून बहुतेक राज्यांतील रुग्णालयांमध्ये बेड मिळणेही कठीण झाले आहे. मे किंवा जून महिन्याच्या अखेरीस ही लाट ओसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण त्यानंतर सप्टेंबर किंवा अॅाक्टोबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या लाटेमध्ये लहान मुलांनाही अधिक संसर्ग होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. (MP BJP Ministers controversial statement over corona crisis) 

तिसरी लाट रोखण्यासाठी केंद्र तसेच राज्यांकडूनही विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. अशा स्थितीत मध्य प्रदेशातील भाजपच्या मंत्री उषा ठाकुर यांनी अजब सल्ला दिला आहे. तिसऱ्या लाटेच्या शक्यतेवरून माध्यमांशी बोलताना ठाकूर म्हणाल्या, तिसऱ्या लाटेसाठी आम्ही सज्ज आहोत. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक संसर्ग होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठीही तयारी सुरू केली आहे. तिसऱ्या लाटेलाही आम्ही यशस्वीपणे सामोरे जाऊ, याची खात्री आहे, असे ठाकूर म्हणाल्या.

पण त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, आपल्या सर्वांना प्रार्थना करते की, पर्यावरणाच्या शुद्धीसाठी सकाळी १० वाजता सर्वांनी एकत्रितपणे आहुती टाकायला हवी. कारण महामारी संपवण्यासाठी अनादी काळापासून यज्ञाची परंपरा जपली आहे. ही यज्ञ चिकित्सा आहे, धर्मांधता नाही. सर्वांनी दोन-दोन आहुती टाका आणि आपल्या हिस्स्याचे पर्यावरण शुध्द करा. तिसरी लाट भारतात येणारही नाही, असे ठाकूर यांनी म्हटले आहे. 

भाजपच्या काही मंत्र्यांनी यापूर्वी असे अजब सल्ले दिले आहेत. तसेच कोरोनाशी संबंधित वादग्रस्त वक्तव्यही केली आहेत. ठाकूर यांनीच काही दिवसांपुर्वी दावा केला होता की, तुप लावलेल्या गोवऱ्या हवनात टाकल्याने घर १२ तास सॅनिटाईज राहील. या वक्तव्यावरून वादही निर्माण झाला होता.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com