कोविशिल्ड लशीचा एक डोस अन् लशींच्या मिक्सिंगवर केंद्र सरकारनं केला महत्वाचा खुलासा

दोन डोस वेगळ्या लशींच्या चाचणी स्तरावरील वापराबाबत (Mix and Match) आम्ही विचार करत असल्याचे सांगितले जातहोते.
Mixing of vaccine is not the protocol same vaccines to be administered says government
Mixing of vaccine is not the protocol same vaccines to be administered says government

नवी दिल्ली : जगभरात कोरोना प्रतिबंधात्मक लशींचे (Corona Vaccine) दोन डोस दिले जात आहेत. पण दोन डोस वेगवेगळ्या लशीचे देण्याबाबतही संशोधन सुरू आहे. भारतातही याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्याचे सांगितले जात होते. तसेच कोविशिल्ड (Covishield) लशीचा एक डोसही पुरेसा असल्याचा दावा एका संशोधकाने केला होता. त्यामुळं आता लसीकरणाचे नवीन धोरण येणार का, याबाबत उत्सुकता होती. (Mixing of vaccine is not the protocol same vaccines to be administered says government) 

नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॅाल यांनी या दोन्ही मुद्यांवर स्पष्टीकरण दिलं आहे. विशेष म्हणजे पॅाल यांनीच दोन डोस वेगळ्या लशींच्या चाचणी स्तरावरील वापराबाबत (Mix and Match) आम्ही विचार करत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज त्यांनीच त्याबाबत खुलासा केला आहे. दोन डोस वेगळ्या लशीचे दिल्यास घातक ठरत नसल्याचे संशोधनातून सिध्द झाल्याशिवाय तसा वापर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच कोविशिल्ड लसीचा केवळ एकच डोस पुरेसा असलेल्या चर्चेलाही त्यांनी पूर्णविराम दिला आहे.

कोरोना पहिला डोस घेतल्यानंतर ठराविक कालावधीने त्याच लशीचा दुसरा डोस घेणे आवश्यक आहे. जगभरात तसाच प्रोटोकॅाल आहे. पण एका संशोधनानुसार दोन डोस वेगवेगळ्या लशींचे घेतले तरी त्याचा चांगलाच परिणाम दिसून आल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये काही दिवसांपूर्वी काही नागरिकांना चुकून दोन वेगळ्या लशींचे डोस देण्यात आले. त्यांनाही काही त्रास झाला नाही.

भारतात सध्या कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड आणि स्पुटनिक व्ही या तीन लशींचा वापर केला जात आहे. स्पुटनिक लशीचा वापर नुकताच सुरू करण्यात आला आहे. ही लस आयात करावी लागत असल्याने देशातील काही मोजक्याच खासगी रुग्णालयांत ही लस दिली जात आहे. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. अनेकदा एकाच केंद्रांवर दोन्ही लशी पुरवल्या जातात. त्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता असते. उत्तर प्रदेशात काही दिवसांपूर्वी 20 नागरिकांना पहिला डोस कोव्हॅक्सिनचा तर दुसरा डोस कोविशिल्डचा देण्यात आला. ही बाब लक्षात आल्यानंतर संबंधितांच्या आरोग्याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. पण अद्याप त्यांना कोणताही त्रास झालेला नाही.

स्पॅनिश विद्यापीठाने केलेल्या अभ्यासामध्येही दोन वेगळ्या लशींचे डोस घेतल्यानंतर काही विपरीत परिणाम होत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. या अभ्यासामध्ये फायजर व अॅस्ट्राझेनेकाच्या लशींचे डोस देण्यात आले. हे दोन्ही डोस सुरक्षित आणि परिणामकारक ठरल्याचे नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळं जगभरात दोन वेगळ्या लशींच्या वापरावर चर्चा सुरू झाली आहे. 

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारताने बुधवारी २० कोटी डोसचा आकडा पार केला आहे. त्यासाठी १३० दिवसांचा कालावधी लागला आहे. अमेरिकेनंतर भारताने एवढ्या वेगाने लसीकरण केले आहे. लसीकरणामध्ये १८ ते ४४ वयोगटांतील १ कोटी ३९ नागरिकांना लस देण्यात आली आहे. तर ४५ वर्षांपुढील १५ कोटी नागरिकांचा यामध्ये समावेश आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com