कोरोनानंतर चीनमध्ये सापडला आणखी एक विषाणू: जगाची उडवली झोप

चीनमधील राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (NHC) याबाबतची माहिती दिली आहे.
China reports first human case of H10N3 Bird Flu
China reports first human case of H10N3 Bird Flu

बीजिंग : कोरोना (Covid-19China reports first human case of H10N3 Bird Flu ) विषाणूची निर्मिती चीनमधील वुहान प्रयोगशाळेतून झाल्याचा दावा अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांनी केला आहे. या विषाणूचा वुहान शहरातून सुरू झालेल्या संसर्गाने अवघ्या जगाला विळखा घातला आहे. त्यातच चीनमधून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बर्ड फ्लूच्या विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण चीनमध्येच आढळून आला आहे. पक्ष्यांमध्ये अत्यंत दुर्मिळ असलेल्या या विषाणूचा मानवाला संसर्ग झाल्याची जगातील ही पहिलीच घटना आहे. (China reports first human case of H10N3 Bird Flu )

चीनमधील राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (NHC) याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा जगाचं लक्ष चीनकडे वेधले गेले आहे. बर्ड प्लूचा H10N3 या दुर्मिळ प्रकाराचा संसर्ग एका व्यक्तीला झाला आहे. चीनमधील झिंगझियांग शहरातील हा रुग्ण असून त्याला २८ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आला होतं. ताप व इतर लक्षणे त्याच्यात आढळून आल्याचे NHC ने स्पष्ट केलं आहे. 

रुग्णामध्ये आढळून लक्षणांच्या आधारे तपासणी केल्यानंतर त्याला H10N3 या विषाणूचा संसर्ग झाल्याचे २८ मे रोजी शिक्कामोर्तब करण्यात आले. पण रुग्णाला हा संसर्ग कसा झाला, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. 

धोका खूप कमी

H10N3 या विषाणू तुलनेनं घातक नाही. तसेच त्याचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत नाही. या रुग्णाची प्रकृती स्थिर असून लवकरच रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची तपासणीत हा विषाणू आढळून आला नाही. 

व्हिएतनाममध्ये आढळला हायब्रीड कोरोना

व्हिएतनाममध्ये कोरोनाचा हा नवीन प्रकार आढळून आला आहे. भारत आणि ब्रिटनमध्ये आढळून येणाऱ्या कोरोनाच्या प्रकारांचा हा हायब्रीड प्रकार असल्याचा दावा व्हिएतनाममधील शास्त्रज्ञांनी केला आहे. हा विषाणू हवेतून वेगाने पसरत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. व्हिएतनामध्ये सध्या कोरोना रुग्णांची वाढ वेगाने होत आहे. तेथील आरोग्यमंत्री गुयेन थान लॅान्ग यांनी कोरोनाच्या नवीन प्रकाराबाबत एका बैठकीत माहिती दिली. 

हवेतून वेगाने पसरतो 

कोरोनाचा हायब्रीड प्रकार हवेतून वेगाने पसरत आहे. या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर खोकल्याच्या तक्रारी वाढत आहेत. एका व्यक्तीपासून परिसरात हा विषाणू वेगाने पसरत असल्याचे अभ्यासात आढळून आले आहे. आरोग्यमंत्र्यांनी या कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची माहिती मात्र दिली नाही. व्हिएतनाममधील सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ हायजीन अॅन्ड एपिडेमियोलॅाजीने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनानुसार त्यांच्या शास्त्रज्ञांनी 32 रुग्णांच्या चार नमुन्यांमध्ये हा प्रकार आढळून आल्याचे सांगितले आहे.  

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com