नितीश कुमारांची ताकद वाढली; माजी केंद्रीय मंत्र्यांचा पक्ष जेडीयूमध्ये विलीन

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे मागील काही दिवसांपासून आपल्या पक्षाची ताकद वाढवत चालले आहेत.
Merger of Upendra Kushwaha led RLSP with CM Nitish Kumars JD(U)
Merger of Upendra Kushwaha led RLSP with CM Nitish Kumars JD(U)

पटना : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे मागील काही दिवसांपासून आपल्या पक्षाची ताकद वाढवत चालले आहेत. चिराग पासवान यांच्या पक्षातील अनेक नेत्यांचा नुकताच नितीश कुमारांच्या जनता दल यूनायडेट (जेडीयू) मध्ये प्रवेश झाला. रविवारी माजी केंद्रीय मंत्र्यांचा पक्ष जेडीयूमध्ये विलीन झाल्याने त्यांची ताकद आणखी वाढली आहे. 

 मागील वर्षी बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत नितीश कुमार यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर राहिला. मात्र, भाजपने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे जागा कमी मिळूनही नितीश कुमार मुख्यमंत्री झाले. पण जागा कमी झाल्याची खंत त्यांच्या मनात कायम आहे. त्यामुळेच भाजप किंवा राष्ट्रीय जनता दलाला तोंड देण्यासाठी पक्षाची ताकद वाढविण्याच्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. 

विधानसभा निवडणूकीत माजी केंद्री मंत्री उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक समता पार्टीचा एकही उमेदवार निवडून आला नाही. मात्र, त्यांचा मित्रपक्ष असलेल्या बहूजन समाज पक्षाचा एक उमेदवार जिंकला. पण त्या आमदाराने काही दिवसांतच जेडीयूमध्ये दाखल होत मंत्रीपदही मिळवले. त्यानंतर नितीश कुमार यांनी चिराग पासवान यांना धक्का दिला. रामविलास पासवान यांच्या निधनानंतर झालेल्या निवडणूकीत चिराग पासवान स्वतंत्रपणे उतरले. पण त्यांना चमक दाखविता आली नाही. उलट अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका करत नितीश कुमार यांना जवळ केले. 

त्यानंतर नितीश कुमार यांनी कुशवाह यांना आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले आहे. कुशवाह हे जेडीयूमध्ये होते. त्यांची आता घरवापसी झाली आहे. त्यांच्या येण्याने नितीश कुमार यांची ताकद वाढली आहे. त्यामुळे कुशवाह यांना लगेच पक्षाच्या राष्ट्रीय संसदीय बोर्डाचे अध्यक्षपद देण्यात आले. राज्य आणि देशातील सध्याची स्थिती पाहून निर्णय घेतल्याचे कुशवाह यांनी पक्षाच्या विलीनीकरणानंतर सांगितले. 

दरम्यान, कुशवाह यांच्या जेडीयूमधील प्रवेशानंतर आरजेडीचे तेजस्वी यादव यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कुशवाह यांनी मागील काही वर्षांत शिक्षणासह विविध मुद्यांवर नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला होता. त्याची आठवण करून देत तेजस्वी यादव यांनी 'आता कुशवाह यांचे विचार अचानक बदलले आहेत,' अशी टिप्पणी केली.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com