मराठा, ओबीसी आरक्षण विधेयक आज मंजूर होणार? 

विधेयकाबाबत विरोधीपक्षकायभूमिकाघेताहेतयाकडेसर्वांचे लक्षलागले आहे.
0Sarkarnama_20Banner_20_202021_05_05T093157.449_1.jpg
0Sarkarnama_20Banner_20_202021_05_05T093157.449_1.jpg

दिल्ली : लोकसभेत  मराठा, ओबीसी आरक्षण  Maratha Reservation संदर्भातील 12७ व्या घटनादुरुस्ती च्या   OBC Reservation विधेयकावर आज लोकसभेत चर्चा होणार आहे.  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री प्रा.वीरेंद्र कुमार करणार चर्चेला सुरुवात करणार आहेत. दुपारी चर्चेला सुरुवात होणार आहे. भाजपाच्या वतीने खासदार रणजीत नाईक निंबाळकर भूमिका मांडणार आहेत . लोकसभेत Lok Sabha काल विधेयक मांडण्यात आले आहे.

मराठा आरक्षण प्रकरणावरून भारतीय जनता पक्षाच्या खासदारांसाठी तीन ओळीचा व्हीप जारी करण्यात आला आहे. सभागृहात  हजर  राहण्यास  सांगितल आहे. दरम्यान याच  पार्श्वभूमीवर आज सकाळी  भाजप  खासदारांची  बैठक  बोलवण्यात आली आहे.  तर  या विधेयकाबाबत विरोधी  पक्ष  काय  भूमिका  घेताहेत  याकडे  सर्वांचे लक्ष  लागले आहे.

चोरी करायची तर स्वखर्चाने तरी करा, शिवसेनेला मनसेचा टोला
मराठा आरक्षणासंबंधी विधेयक काल लोकसभेत मांडले ( maratha reservation ) आहे. या विधेयकामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अधिकार मिळणार आहे. तसंच एसईबीसी प्रवर्ग ठरवण्याचे अधिकारही राज्यांना मिळणार आहेत. विधेयकात ३३८ ब आणि ३४२ अ या अंतर्गत काही दुरुस्त्या होणार आहेत.  एखाद्या समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवण्याचा राज्यांचा अधिकार केंद्र सरकारने केलेल्या १२७ व्या घटनादुरुस्तीनंतर रद्दबातल झाल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं.

मराठा आरक्षण प्रकरणी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना आरक्षण निश्चित करण्याचा अधिकार नसल्याचंही म्हटलं. राज्यघटनेनुसार 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण देता येत नाही असं सर्वोच्च न्यायालयानेच यापूर्वी स्पष्ट केलं आहे. मराठा आरक्षण सुनावणी दरम्यान 50 टक्क्यांची मर्यादा भंग करण्यासाठी कोणताही वैध आधार नव्हता, असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात नोंदवलं होतं. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com