ममतादीदींची निवडणूक आयोगाला चपराक..सत्ता पुन्हा हाती येताच IAS,IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या..  - many ias officers transferred in west bengal Mamata Banerjee | Politics Marathi News - Sarkarnama

ममतादीदींची निवडणूक आयोगाला चपराक..सत्ता पुन्हा हाती येताच IAS,IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या.. 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 मे 2021

ममता बॅनर्जींनी  २७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. 

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये west bengalतिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ममता बॅनर्जीं यांनी विविध अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यास सुरवात केली आहे. यात IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या समावेश आहे. many ias officers transferred in west bengal Mamata Banerjee

आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक आयोगाने काही पोलिस व इतर अधिकाऱ्यांची बदली केली होती. बॅनर्जी यांनी त्यांना पुन्हा पूर्वीच्या पदावर नेमण्यास सुरुवात केली आहे. ममता बॅनर्जींनी या दोघा आयपीएस अधिकाऱ्यांना आधीच्या पदावर नेमल्याचे सूत्रांनी सांगितले.ममता बॅनर्जींनी  २७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. 

राष्ट्रवादीच्या आमदारांची युवकाला दमबाजी...म्हणाले,  " ही लास्ट वॉर्निंग..मी काहीही करु शकतो..." 

वीरेंद यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदावरून बदली करत निवडणूक आयोगाने त्यांच्याऐवजी पी. नीरजनारायण यांची नियुक्ती केली होती. बॅनर्जी यांनी वीरेंद्र यांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नेमणूक केली आहे. जावेद शमिन यांचीही पुन्हा अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी (कायदा व सुव्यवस्था) नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक काळात बदली होणारे शमिन हे पहिले आयपीएस अधिकारी ठरले होते. 

कोलकाता विकास महानगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. उलगानाथन यांची २४ परगाना जिल्हाधिकारी म्हणून बदली केली आहे. पश्चिम वर्ध्वमानचे जिल्हाधिकारी अनुराग श्रीवास्तव यांची बंगाल मिनरल डेव्हलमेंट अॅण्ड ट्रेडिंग कॅारपोरेशन लिमिटेड येथे बदली करण्यात आली आहे. २९ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या ममतादीदींनी केल्या आहेत. 

हेही वाचा : मोदी, शाह यांचे नाव 'केडीएसए' ने धुळीला मिळवलं...भाजप नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर 

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव अनेक नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे.  तृणमूल कॅाग्रेसकडून झालेल्या पराभवाचे खापर ते एकमेंकांवर फोडत आहेत. बंगालमध्ये भाजप नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत.  त्रिपुराचे माजी राज्यपाल व भाजपचे ज्येष्ठ नेते तथागत रॉय Tathagata Rai यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष, शिव प्रकाश, अरविंद मेनन आणि प्रभारी कैलास विजयवर्गीय यांच्यासह पक्षाच्या अन्य नेत्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तथागत रॉय यांनी टि्वट करीत या नेत्यांवर निशाणा साधला आहे. 

Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख