राष्ट्रवादीच्या आमदारांची युवकाला दमबाजी...म्हणाले, " ही लास्ट वॉर्निंग..मी काहीही करु शकतो..." - Maratha Reservation NCP MLA Shashikant Shinde threaten youth | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीच्या आमदारांची युवकाला दमबाजी...म्हणाले, " ही लास्ट वॉर्निंग..मी काहीही करु शकतो..."

ओंकार कदम
शुक्रवार, 7 मे 2021

शशिकांत शिंदे यांनी युवकांच्या घरी जाऊन त्यांच्या घरी जाऊन दमबाजी केली.

सातारा : मराठा आरक्षणाच्या Maratha Reservationनिकालानंतर काल मराठ्यायांची राजधानी साताऱ्यात त्याचे पडसाद पाहायला मिळाले. दोन युवकांनी गृहमंत्र्यांच्या घरासमोर शेण्या जाळल्या तर राष्ट्रवादी NCP आणि काँग्रेस च्या कार्यालयाची तोडफोड केली. यानंतर या तरुणांनी तोडफोड करतानाचे  व्हिडीओ आणि प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. आरक्षणाच्या निकाला विरोधात हा झालेला उद्रेक होता. Maratha Reservation NCP MLA Shashikant Shinde threaten youth

या गोष्टीची माहिती राष्ट्रवादी कॅाग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांना समजल्यावर त्यांनी युवकांच्या घरी जाऊन त्यांच्या कुंटुबियांना दमबाजी केली. त्यांना नीट समजून सांगा मी मनात आणलं तर मी काहीही करू शकतो. ही लास्ट वॉर्निंग आहे परत सांगायला येणार नाही असा दम देखील भरला.

मोदी, शाह यांचे नाव 'केडीएसए' ने धुळीला मिळवलं...भाजप नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर 

शशिकांत शिंदेंच्या या दमबाजीला तेवढ्याच प्रखरतेने उत्तर देत हल्लेखोर तरुणांनी सुद्धा आमदार शशिकांत शिंदे यांना आव्हान दिले आहे. मराठा समाजाची चेष्टा झाल्यामुळे हे आमचे प्रतिउत्तर आहे, हा तुम्ही ठराविक मावळ्यांचा उद्रेक बघत आहात जून तुम्हाला सर्वांचा उद्रेक बघायचा आहे. मराठा समाजाची ज्यांनी चेष्टा केली आहे त्यांच्यासाठी हे एकच उत्तर आहे.

हेही वाचा : बंद शाळांमध्ये वॉटर फिल्टर बसविण्याचा घाट..पिंपरी महापालिकेत भाजपचा अजब थाट..

 पिंपरी :  सध्या कोरोनामुळे शाळा गेले वर्षभर बंद आहेत. पुढील दोन महिने त्या सुरु होण्याची शक्यता दिसत नाही. तरीही या बंद पालिका शाळांत अडीच कोटी रुपये खर्चून वॉटर फिल्टर व कूलर ते ही तातडीने बसविण्याचा प्रस्ताव (subject of water filter fitting in closed  school)भाजप सत्ताधारी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या pcmc स्थायी समितीच्या गेल्या बैठकीत (ता. २८) ठेवण्यात आला (subject put in standing committee)होता. नशीब तो दफ्तरी दाखल झाला. तरी, त्यामुळे विरोधकांच्या हाती भाजपवर सडकून टीका करण्याचे आयतेच कोलित मिळाले.  Criticism on BJP in pcmc water filter fitting in closed sch

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख