असंही लसीकरण...भाजपचा मंत्री अन् त्याच्या पत्नीसाठी घरीच धावली यंत्रणा

कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला कालपासून सुरूवात झाली आहे.
Karnataka Minister BC Patil takes COVID19 vaccine at his residence
Karnataka Minister BC Patil takes COVID19 vaccine at his residence

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला कालपासून सुरूवात झाली आहे. अनेक मंत्री, राजकीय पक्षांचे पदाधिकारी लसीकरण केंद्रावर जाऊन लस टोचून घेत आहेत. पण भाजपच्याच एका मंत्र्याने प्रोटोकॉल तोडल्याचे समोर आले आहे. या मंत्र्यांनी घरीच पत्नीसह लस घेतली असून आता त्यावरून वाद निर्माण झाला आहे. 

कोरोना लसीकरणासाठी केंद्र निश्चित करण्यात आली आहे. या केंद्रांवर जाऊन लस घेणे अपेक्षित आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन अशा अनेकांनी रुग्णालयात जाऊन लस घेतली. त्यासाठी विशिष्ट यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे. पण कर्नाटकमधील कृषी मंत्री बी. सी. पाटील यांनी पत्नीसह घरीच लस घेतली. 

पाटील यांनी याबाबत स्वत:हून ट्विटरवर ही माहिती दिली. लस घेतानाचा फोटोही त्यांनी ट्विट केला आहे. सरकारी डॉक्टरांकडून हिरेकेरुर येथील घरी पत्नीसह सह कोरोना लस घेतली. स्वदेशी लसींचे अनेक देशांनी कौतुक केले आहे. काही लोक याबाबत चुकीची माहिती पसरवत असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच त्यांनी लोकांना नियमांचे पालन करून लस घेण्याचे आवाहनही केले आहे. यावरून आता वाद निर्माण झाला आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पाटील यांच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ''प्रोटोकॉलनुसार हे मान्य नाही. राज्य सरकारकडून याबाबतचा अहवाल मागविण्यात आला आहे,'' असे भूषण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

दरम्यान, कोरोना लस घेतल्यानंतर लाभार्थींना लसीकरणाचे प्रमाणपत्र दिले जात आहे. या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापण्यात आला आहे. हा फोटो आता वादात सापडला असून त्यावरून राजकारण सुरू झाले आहे. प्रमाणपत्रावरील हा फोटो काढण्यासाठी विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

देशभरात 1 मार्चपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली आहे. या टप्प्यात 60 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांसह अन्य आजार असलेल्या 45 वर्षांपुढील नागरिकांना लस दिली जात आहे. तर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आधापासूनच ही लस दिली जात आहे. लस घेतल्यानंतर लाभार्थ्यांना डिजिटल किंवा प्रिंटेड स्वरूपात लसीकरण प्रमाणपत्र दिले जात आहे.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com