सुब्रह्मण्यम स्वामी महाराष्ट्रासाठी धावून आले; थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा

पंतप्रधान मोदी यांनी नुकतीच गुजरातमध्ये नुकसानग्रस्त भागाची हवाई पहाणी केली.
Issue cheques for Maharashtra and Kerala says Subramanian swami
Issue cheques for Maharashtra and Kerala says Subramanian swami

नवी दिल्ली : भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्र्यांवरही टीका केली आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यात अपयश आल्याने त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॅा. हर्षवर्धन यांनाही झोडले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. तर काही दिवसापूर्वीच त्यांनी कोरोना नियंत्रणात आणल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र सरकारचे  कौतुकही केले आहे. (Issue cheques for Maharashtra and Kerala says Subramanian Swami )

स्वामी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. तोक्ते वादळाने गुजरातसह महाराष्ट्र, गोवा कर्नाटक, केरळ या राज्यांना जोरदार तडाखा दिला आहे. पाचही राज्यांत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. गुजरातला या वादळाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. पंतप्रधान मोदी यांनी नुकतीच गुजरातमध्ये नुकसानग्रस्त भागाची हवाई पहाणी केली. तसेच यावर बैठक घेत एक हजार कोटी रुपयांची मदतही जाहीर केली. त्यावरून स्वामी यांनी पंतप्रधान मोदींना घरचा आहेर दिला आहे.

'पंतप्रधान गुजरातला गेले आणि एक हजार रुपयांचा चेकही दिला. आता पक्षपातीपणा न करता त्याहून अधिक रकमेचा चेक महाराष्ट्र व केरळला द्यायला हवा. तिथे ते गेले नाहीत, पण खूप नुकसान झाले आहे,' असे ट्विट स्वामी यांनी केलं आहे. हे ट्विट ३० हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे. तर पाच हजारांहून अधिक जणांनी रिट्विट केलं आहे. 

दरम्यान, पंतप्रधानांच्या गुजरात भेटीनंतर महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांनी टीका केली. तर या भेटीवर भाजपमधून स्वामी यांची प्रतिक्रिया आली आहे. महाराष्ट्र व इतर राज्यांतील भाजप नेत्यांकडून मात्र अद्याप अशी मागणी करण्यात आलेली नाही. 

भाजपच्याच नेत्यांना दबाव टाकावा लागतोय

पंतप्रधान हवाई दौरा करून केवळ गुजरातची पाहणी केली. ते देशाचे पंतप्रधान आहेत. अनेक राज्यांचे नुकसान झालेले असताना केवळ एकाच राज्याला मदत करतात. इतर राज्यांबाबत दुजाभाव योग्य नाही. मदतीसाठी इतर पक्षांच्या नेत्यांचा त्यांच्यावर दबाव होता. पण आता त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांना त्यांच्यावर दबाव टाकावा लागतोय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com