सरकारचा पाठिंबा काढला अन् आमदाराच्या घरावर आयकर विभागाची धाड - Income tax department conducted raids at haryanas independent mla | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांकडून 5 हजार 400 कोटींचे पॅकेज जाहिर...
पुढील 15 दिवस संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू ठेवणार...
नोंदणीकृत घरगुती कामगारांनाही आर्थिक मदत देणार...
नोंदणीकृत फेरीवाल्यांनाही पंधराशे रुपयांची मदत मिळणार...
परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये देणार...
पुढील महिनाभर गरीबांसाठी मोफत शिवभोजन थाळी...दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मिळणार
राज्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी...मुख्यमंत्र्यांची घोषणा

सरकारचा पाठिंबा काढला अन् आमदाराच्या घरावर आयकर विभागाची धाड

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

आमदाराने केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्यांना विरोध केला आहे.

चंदीगड : भाजपच्या सरकारचा पाठिंबा काढणाऱ्या अपक्ष आमदाराच्या घरांवर आयकर विभागाने आज छापे टाकले आहेत. या आमदाराने केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्यांना विरोध केला आहे. तसेच शेतकरी आंदोलनातही ते सहभागी होत आहेत.

हरयाणातील खट्टर सरकारला अपक्ष आमदार बलराज कुंडू यांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर आज त्यांच्या घरासह 30 ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले आहे. रोहतक व गुरूग्राम येथील त्यांचे घर तसेच त्यांचे दोन्ही भाऊ, पत्नीचे माहेर आमि इतर नातेवाईकांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले आहेत. 

कुंडू यांनी 2019 मध्ये हरयाणात अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढविली होती. भाजपने त्यांना तिकीट देण्यास नकार दिला होता. या निवडणुकीत कुंडू यांनी भाजपचे उमेदवार शमशेर सिंह खरखरा यांचा पराभव केला. तसेच काँग्रेसचे नेते आनंद सिंह दांगी हेही या निवडणुकीत पराभूत झाले. निवडणुकीनंतर कुंडू यांनी मनोहर लाल खट्टर सरकार पाठिंबा दिला. मात्र, मागील वर्षी त्यांनी सरकारचा पाठिंबा काढला. 

हेही वाचा : थकबाकीदारांनी घेतला बत्ती गुलचा धसका

कुंडू यांनी केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्यांना विरोध केला आहे. ते उघडपणे शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. किसान महापंचायतींमध्येही ते दिसतात. तसेच त्यांनी मागील वर्षी सहकार मंत्री मनीष ग्रोवर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. पण खट्टर सरकारने कारवाई न केल्याने त्यांनी सरकाराचा राजीनामा काढला. मुख्यमंत्री भ्रष्ट लोकांना पाठिशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. 

दरम्यान, काँग्रेसने खट्टर सरकारविरोधात विधानसभेत अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खट्टर सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. कृषी कायद्यांवरून उमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला नाराज आहेत. त्यांनीही सरकारचा पाठिंबा काढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अविश्वास ठराव आल्यास खट्टर सरकराला बहुमत सिध्द करावे लागेल. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख