अमित शहांकडून भाजपच्या खासदारांची झाडाझडती

कोरोना काळात भाजपकडून 'सेवा ही संघटन' ही मोहिम राबवण्यात आली.
HM Amit Shah takes review of Maharashtra MPs work
HM Amit Shah takes review of Maharashtra MPs work

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरात कहर केला. या लाट थोपवण्यात केंद्र सरकारला अपयश आल्याने मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागले. औषधे, ऑक्सीजन, बेड यांसह प्राथमिक सुविधांच्या अभावामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. या टीकेला सामोरे जाताना भाजपने देशभरातील कार्यकर्त्यांना नागरिकांना मदत करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. याअनुषंगाने आता कोणत्या खासदारांनी किती मदत केली, या लेखाजोखाच केंद्रीय नेतृत्वाकडून घेतला जात आहे. (HM Amit Shah takes review of Maharashtra MPs work)

कोरोना काळात भाजपकडून 'सेवा ही संघटन' ही मोहिम राबवण्यात आली. याअंतर्गत खासदारांनी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) तसेच संघटनमंत्री बी. एल. संतोष यांच्यासोबत महाराष्ट्रातील काही निवडक खासदारांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत खासदारांच्या कामांचा आढावा घेण्यात आल्याचे समजते. 

विरोधकांकडून भाजपवर सातत्याने टीका केली जात आहे. केंद्र सरकारच्या कामावर सामान्य नागरिकांमध्येही नाराजी आहे. लसीकरणातील गोंधळही त्यास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे भाजपकडून नागरिकांच्या मदतीसाठी सर्वप्रकारे प्रयत्न करण्याचे आदेश देशभरातील खासदार, आमदारांना देण्यात आले आहेत. विरोधकांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी म्हणून जे. पी. नड्डा यांनी खासदारांबरोबर बैठका सुरू केल्या आहेत. ऑनलाइन बैठकांमध्ये भाजपच्या प्रत्येक खासदाराने कोरोना काळात केलेले काम पाहिले जात आहे. लोकसभा अध्यक्षांनाही या कामाची माहिती पाठवावी लागणार आहे. 

सेवा ही संघटन या मोहिमेतील दुसरा टप्पा आता सुरू करण्यात आला आहे. यामध्ये लसीकरण मोहिम, मदत कार्य आणि युवक व महिला कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण अशा उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. लसीकरण मोहिमेमध्ये 'माझा बूथ लसीकरणयुक्त' हा कार्यक्रम हाती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लसीकरणासाठी नागरिकांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच 18 वर्षांपुढील नागिरकांच्या लसीकरणावरही भर दिला जाणार आहे. 

मदत कार्यामध्ये नागरिकांना मास्क, सॅनिटायझर, रेशन कीटचे वाटप, ज्येष्ठांना मदत, टेलीमेडीसीन सुविधा अशा सेवा देण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे. भाजपने देशभरात दोन लाख शहरी आणि ग्रामीण भागातील एक युवक व एक महिला कार्यकर्तीला प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट टेवले आहे. त्यानुसार प्रत्येक गावात आरोग्यविषय सुविधा देण्यात येणार आहेत. या स्वयंसेवकांकडून नागरिकांना आरोग्यविषय सुविधा दिल्या जातील. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com