'ब्लॅक फंगस'चे संकट; देशातील दोन राज्यांकडून महामारी घोषित...

कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येण्याची चिन्हंअसतानाच आता नवे संकट घोंघावू लागलं आहे.
Haryana and Rajasthan government declares Black Fungus an epidemic
Haryana and Rajasthan government declares Black Fungus an epidemic

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येण्याची चिन्हं असतानाच आता नवे संकट घोंघावू लागलं आहे. कोरोनामुक्त झालेल्या अनेकांना म्युकरमायकोसीस (ब्लॅक फंगस) हा आजार होत आहे. महाराष्ट्रासह देशांतील अनेक राज्यांमध्ये या आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. या आजारावर वेळीच उपचार न घेतल्यास जीवावर बेतण्याची भीती आहे. त्यामुळं सर्वच राज्य सतर्क झाली असून देशातील दोन राज्यांनी या आजाराला महामारी म्हणून घोषित केलं आहे. (Haryana and Rajasthan government declares Black Fungus an epidemic)

हरयाणा व राजस्थान सरकारने हा निर्णय घेतला असून हा निर्णय घेणारे हरयाणा हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. या आजाराने राजस्थानमध्ये आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. जयपुर, अजमेर, जोधपुर, कोटा, उदयपुर आदी जिल्ह्यांमध्ये 400 हून अधिक रुग्ण आहेत. पण सरकारकडे केवळ 100 रुग्णांची नोंद आहे. इतर रुग्णांची नोंदच घेतली गेली नाही. हरयाणामध्ये रुग्ण वाढत असल्याने काल महामारी घोषित करण्यात आली. आता महामारी घोषित करण्यात आल्याने प्रत्येक रुग्णाची नोंद ठेवली जाणार आहे. 

म्युकरमायकोसिस या आजाराचा संसर्ग नाक, तोंड या मार्गाने मेंदूपर्यंत होऊ शकतो. मेंदूपर्यंत संसर्ग पोहोचल्यावर उपचारांना एकदम मर्यादा येतात.  म्युकरमायकोसिसवर उपचार करण्यासाठी लागणारी अनेक औषधे महाग आहेत आणि मर्यादीत प्रमाणातच राज्यातील औषधांच्या दुकानांमधून उपलब्ध आहेत. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातलगांचे हाल होण्याची शक्यता आहे. सध्या प्रामुख्याने कोरोनाची बाधा झालेल्या आणि रोगप्रतिकारक क्षमता दुर्बल असलेल्या अनेकांना म्युकरमायकोसिसची लागण होत आहे. 

हा आजार संसर्गजन्य आजाराप्रमाणे (साथीच्या आजाराप्रमाणे) पसरण्याचा धोका डॉक्टरांकडून व्यक्त होत आहे. म्युकरमायकोसिस या आजारात अंधत्व येण्याचा धोका आहे. रुग्णाच्या जगण्याची शक्यता जेमतेम ५० टक्के एवढीच आहे. काळ्या बुरशीचा आजार असेही म्युकरमायकोसिस या आजाराला म्हणतात. यात शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना बुरशी येते आणि त्यांची कार्यक्षमता कमी होते. हळू हळू ते अवयव पूर्णपणे निकामी होतात. 

महाराष्ट्रात स्वतंत्र उपचारव्यवस्था

म्युकरमायकोसिस या आजारांचे गांभीर्य ओळखून राज्य सरकाने महात्मा फुले जनआरोग्य योजनेत म्युकरमायकोसिसवर उपचार करण्यासाठी समावेश केल्याचा निर्णय घेतला आहे.  राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. या निर्णयामुळे कोरोनामुक्त झालेल्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. सध्या दररोज म्युकोरमायकोसिसचे साधारण दोन नवे रुग्ण आढळत आहेत. या आजारावर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली अँटी फंगल औषधे अतिशय महाग आहेत. या आचाराचा फैलाव विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र परिसरात होत असल्याचे आढळले आहे. तसेच शहरांमध्येही रुग्ण आढळून येऊ लागले आहेत.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com