लशीच्या चाचण्यांतून 525 मुलांच्या जीवाशी खेळ; उच्च न्यायालयात याचिका

भारत बायोटेकने २ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लस तयार केली आहे.
PIL challenging DCGI nod to Phase 2 and 3 clinical trials of Covaxin for 2 to18 years of age
PIL challenging DCGI nod to Phase 2 and 3 clinical trials of Covaxin for 2 to18 years of age

नवी दिल्ली : कोरोनाचे (Covid19 )संक्रमण रोखण्यासाठी सध्या जगभरात लसीकरणावर भर दिला जात आहे. भारतातही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन (Covaxin) व सिरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड (Covishield) लशींचे डोस नागरिकांना दिले जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांनाही मोठ्या प्रमाणावर संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यापार्श्वभूमीवर भारत बायोटेकने २ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लस तयार केली आहे. या लशीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या लवकरच सुरू होणार आहेत. (PIL challenging DCGI nod to Phase 2 and 3 clinical trials of Covaxin for 2 to18 years of age)

भारत बायोटेकच्या चाचण्यांना सेंट्रल ड्रग्ज स्टॅन्डर्ड अॅार्गनायझेशन (CDSCO) च्या कोविड-१९ तज्ज्ञ समितीने मान्यता दिली आहे. या चाचण्या दिल्ली व पाटणातील AIIMS सह नागपूरमधील ५२५ मुलांवर होणार आहेत. पुढील 10 ते 15 दिवसांत या चाचण्या सुरू होण्याची शक्यता आहे. पण त्यापूर्वीच या चाचण्यांचा मुद्दा दिल्ली उच्च न्यायालयात गेला आहे. या चाचण्यांवर आक्षेप घेणारी जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. तसेच चाचण्यांना स्थगिती देण्याची मागणीही करण्यात आली. ही चाचणी म्हणजे अल्पवयीन मुलांच्या जीवाशी खेळ ठरेल, असेही याचिकेत म्हटले आहे.

आज न्यायालयात यावर सुनावणी झाली. पण न्यायालयाने चाचण्यांना स्थगिती देण्यास नकार दिला आहे. तसेच या चाचण्यांना दिलेजल्या परवानगीबाबत केंद्र सरकार, CDSCO आणि इतर संबंधितांना नोटीस बजावली असून आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. चाचण्यांमध्ये कोणती 525 मुलं सहभागी होणार आहेत, याची माहिती देण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

का आहे चाचण्यांवर आक्षेप?

संजीव कुमार यांनी ही याचिका दाखल केली आहे. चाचण्यांसाठी वापरण्यात आलेला स्वयंसेवक हा शब्द इथे लागू होत नाही. स्वयंसेवक म्हणजे स्वत:हून काहीतरी करण्याची दाखवणारा. पण इथे 2 ते 18 वयोगटातील मुलं अल्पवयीन आहेत. त्यांना याबाबत काहीच समजू शकणार नाही. कशाच्या आधारावर ते संमती देणार? पालकांनी मुलांच्या वतीने संमती दिली तरी ते बेकायदेशी र आणि मुलांवर अन्यायकारक ठरेल. कारण हे कृत्य मुलांच्या भल्यासाठी नसेल. या चाचणीत मुलांचा मृत्यूही होऊ शकतो, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. 

दरम्यान, या चाचण्यांमध्ये लशीची परिणामकारकता, सुरक्षितता, प्रतिकारशक्ती तपासली जाईल. चाचणीचा तिसरा टप्पा सुरू करण्यापूर्वी भारत बायोटेकला दुसऱ्या टप्प्यातील सविस्तर अहवाल तज्ज्ञ समितीकडे सादर करावा लागणार आहे. या टप्प्यातील सुरक्षिततेवर पुढील टप्प्यातील चाचण्यांना परवानगी दिली जाईल, असे सुत्रांनी सांगितले. सध्या अमेरिका व कॅनडा या देशांमध्ये १२ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू केले आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com