इंधन दरवाढीवर पेट्रोलियम मंत्री म्हणतात...आम्ही पैशांची बचत करतोय! 

मागील काही महिन्यांपासून देशात पेट्रोल व डिझेलच्या दर सातत्याने वाढत आहेत.
Fuel prices we are saving money for welfare schemes says Dharmendra Pradhan
Fuel prices we are saving money for welfare schemes says Dharmendra Pradhan

नवी दिल्ली : देशभरात महागाईचा भडका उडाला असून पेट्रोलच्या (Petrol Price) दराने अनेक शहरांत शंभरी पार केली आहे. यावरून विरोधकांनीही रान उठवले असून ही इंधनाचे दर कमी करण्याची मागणी केली जात आहे. केंद्र सरकारकडून मात्र याबाबत छुप्पी साधली जात आहे. केंद्रीय मंत्र्यांसह भाजप नेत्यांकडून राज्यांकडे बोट दाखवले जात आहे. (Fuel prices we are saving money for welfare schemes says Dharmendra Pradhan)

मागील काही महिन्यांपासून देशात पेट्रोल व डिझेलच्या दर सातत्याने वाढत आहेत. पाच राज्यांतील निवडणुकांच्या कालावधीत दरवाढ थांबली होती. पण निवडणुका झाल्यानंतर दुसऱ्या दिवसांपासून जवळपास दररोज दर वाढत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलचा प्रति लिटर शंभर रुपयांहून अधिक झाला आहे. तसेच डिझेलचे दरही वाढत असून अनेक राज्यांत हे तर प्रति लिटर 90 ते 95 रुपयांपर्यंत पोहचले आहेत. 

इंधर दरवाढीविषयी माध्यमांशी बोलताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कोरोना लसीकरणाचे कारण दिले. ते म्हणाले, सध्याचे इंधनाचे दर लोकांसाठी अडचणीचे असल्याचे मी मान्य करतो. पण राज्य किंवा केंद्र सरकारकडून लसीकरणासाठी 35 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. अशा परिस्थितीत आम्ही कल्याणकारी योजनांसाठी पैशांची बचत करत आहोत. 

महाराष्ट्राकडे दाखविलं बोट

काँग्रेसकडून इंधनदरवाढीवर होत असलेल्या विरोधावर बोलताना प्रधान यांनी काँग्रेसशासित राज्यांकडे बोट दाखविले. महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान या काँग्रेसशासित राज्यांमध्ये इंधनाचे दर सर्वाधिक का आहेत, याचे उत्तर राहुल गांधी यांनी द्यावे. गरिबांची त्यांना खूप काळजी असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी इंधनावरील कर कमी करण्यास सांगावे. मुंबईत इंधनाचे दर सर्वाधिक आहेत, असे प्रधान म्हणाले. 

दरम्यान, प्रधान यांनी काही महिन्यांपूर्वी इंधनाचे दर हिवाळ्यामध्ये दरवर्षी वाढतात, असे म्हटले होते. हिवाळ्यानंतर हे दर कमी होतील, असा दावाही त्यांनी केला होता. पण प्रत्यक्षात इंधनाचे दर सातत्याने वाढत चालले आहेत. त्यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी अधिक असल्याचे सांगितले होते. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com