पी.व्ही. नरसिंह राव यांचे ओएसडी राम खांडेकर यांचे निधन 

पी. व्ही. नरसिंह राव आणि यशवंतराव चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केलेले राम खांडेकर यांचं निधन झाले.
Sarkarnaa Banner (4).jpg
Sarkarnaa Banner (4).jpg

नागपूरः माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आणि माजी संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केलेले राम खांडेकर (वय ८७) यांचं काल निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा मुकुल, सून संगीता, नातवंडे असा परिवार आहे.  आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. former prime minister pv narasimha rao osd ram khandekar passes away

राम खांडेकर यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. काल रात्री नागपूरमधील त्यांच्या मूळ गावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. अत्यंत विद्वान आणि साहित्याशी संबंध असलेल्या राम खांडेकर यांचा अनेक नेत्यांशी संपर्क होता.  

खांडेकर यांनी राजकारणाबरोबरच विविध वृत्तपत्र व दिवाळी अंकांसाठी लेखन केलं आहे. त्यांच्या शासकीय सेवेतील अनुभव त्यांनी पुस्तकाच्या स्वरुपात मांडले आहेत. २०१९ मध्ये  'सत्तेच्या पडछायेत' हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झालं.

नरसिंहराव यांच्यासोबत 1985 ते त्यांच्या निधनापर्यंत राम खांडेकर यांनी काम केलं.  १९९१मध्ये जेव्हा नरसिंह राव पंतप्रधान झाले तेव्हा खांडेकर हे त्यांचे सर्वात विश्वासार्ह व्यक्ती मानले गेले होते. तर यशवंतराव चव्हाण आणि नरसिंहराव यांचे खाजगी सचिव म्हणून तब्बल चार तपांची शासकीय सेवेतील कारकिर्द राम खांडेकर यांनी अनुभवली होती. 

 भाजपनं ओबीसींचे गळे कापले..त्यांना मोर्चा काढण्याचा अधिकार नाही..
 
वर्धा :  "देशातील ओबीसी समाजाचे नुकसान करण्याचं काम भाजपाने केलं," असा आरोप कॅाग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. "ओबीसी समाजाचे नुकसान करण्याचं काम भाजपाने केलं हे मी पुराव्यासहित सांगतो आहे. मार्च महिन्यातली सुप्रीम कोर्टाची ऑर्डर मी वाचली आहे. ओबीसी आरक्षणाबाबत भाजपच्या "चोराच्या उलट्या बोंबा" आहे.  भाजपला मोर्चा काढण्याचाही अधिकार नाही, त्यांनी ओबीसींचे गळे कापले," असा सवाल पटोलेंनी उपस्थित केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली खुर्ची वाचवण्यासाठी  नागपूर जिल्हा परिषदेचा दुरुपयोग केला नसता तर प्रोसेस तर सुरू होती बाकीचा विषय येतच नव्हता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे हा प्रश्न उपस्थित झाला नाही. १९९५ मध्ये त्यांचं सरकार आलं होतं तेव्हाही त्यांनी ओबीसींचे गळे कापले. गेल्यावेळीही सरकार त्याचं होतं, तेव्हा ओबीसींचा त्यांनी सत्यानाश केला. ओबीसीच्या भरोशावर भाजप सत्तेत आलं. त्याच ओबीसीला जमिनीत गाढण्याचं काम भाजपने केलं आहे. भाजपाने आमचा कर्दनकाळ केला, हे ओबीसींना समजले आहे. त्यामुळे ओबीसींनी भाजपचा कर्दनकाळ करण्याचे ठरवले आहे, असे पटोले म्हणाले.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in