माजी मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान.."मुस्लिम समाज लसीकरणापासून दूर पळत आहेत.." - former cm trivendra singh rawat says muslims avoiding covid vaccination  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

माजी मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान.."मुस्लिम समाज लसीकरणापासून दूर पळत आहेत.."

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 15 जून 2021

मुस्लिम समाजात लसीकरणाबाबत अनेक गैरसमज आहेत. ते दूर करणे गरजचे आहे.

ऋषिकेश : उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुस्लिम समाजाबाबत वादग्रस्त विधान केल्याने ते वादात सापडले आहेत. एका कार्यक्रमात ते म्हणाले की, "देशात मुस्लिम समाज कोरोना लसीकरणापासून दूर पळत आहेत. मुस्लिम समाजात लसीकरणाबाबत अनेक गैरसमज आहेत. ते दूर करणे गरजचे आहे. याबाबत जनजागृती करणं गरजेचं आहे," असे त्रिवेंद्र सिंह रावत म्हणाले. 

ऋषिकेश येथे रक्तदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रावत बोलत होते. ते म्हणाले की कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी लशीकरण महत्वाचे आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकेल. सामाजिक संघटना आणि प्रसारमाध्यमांनी मुस्लिम समाजात याबाबत जनजागृती करणं गरजेचे आहे. 

त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुस्लिम समाजाला सांगितले की, जर तुम्ही लस घेतली नाही तर कोरोना कसा संपणार, आपण लस घेतली नाही तर आपल्याला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. आपण सुपर स्प्रेडर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्यामुळे तुम्ही लसीकरण मोहीमेत सहभागी व्हा.

"पाकिस्तान सरकारने लस न घेणाऱ्यांचे फोन ब्लॅाक करणे, पगार रोखणे अशी कारवाई करण्यास सुरवात केली आहे, अशी कारवाईने लसीकरणाबाबत जनजागृती होऊ शकेल," असेही रावत म्हणाले. "युवकांनी कोरोना लस घेण्यापूर्वी रक्तदान करावे," असे आवाहन त्यांनी केलं आहे.   
 
मंत्रीपदाचा गैरवापर करुन अनिल परबांनी खरेदीखत केलं... 
मुंबई : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब  यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी टि्वट करीत निशाणा साधला आहे. अनिल परब यांनी मंत्रीपदाचा गैरवापर करुन दापोली येथील साई रिसॅार्टचे खरेदी खत जुन्या तारखेने रजिस्टर केले. हे रजिस्ट्रेशन त्यांनी त्यांचा मित्र सदानंद कदम यांच्या नावावर केले असून पेमेंटबाबत कुठलीही नोंद न केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख