मंत्रीपदाचा गैरवापर करुन अनिल परबांनी खरेदीखत केलं.. - BJP leader Kirit Somaiya allegations against Anil Parab | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

मंत्रीपदाचा गैरवापर करुन अनिल परबांनी खरेदीखत केलं..

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 15 जून 2021

अपूर्ण माहितीचे खरेदी खत रजिस्टर होत नाही, असे किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब  यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी टि्वट करीत निशाणा साधला आहे. अनिल परब यांनी मंत्रीपदाचा गैरवापर करुन दापोली येथील साई रिसॅार्टचे खरेदी खत जुन्या तारखेने रजिस्टर केले. हे रजिस्ट्रेशन त्यांनी त्यांचा मित्र सदानंद कदम यांच्या नावावर केले असून पेमेंटबाबत कुठलीही नोंद न केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.BJP leader Kirit Somaiya allegations against Anil Parab

याबाबत सोमय्या यांनी टि्वट केलं आहे. ते आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की, अनिल परब स्वतः गैर कायदेशीर करार/ खरेदीखत दबाव आणून, मंत्रीपदाचा दुरुपयोग करून रजिस्टर करतात

दापोली साई रिसॉर्ट हे सदानंद कदमला 30/12/2020 ला विकल्याचा करार केला आहे. त्यावर चेक नंबर,पेमेंटची अधिकृत माहितीच दिली नाही. अपूर्ण माहितीचे खरेदी खत रजिस्टर होत नाही.

किरीट सोमय्या यांनी यापूर्वी साई रिसॅार्टच्या खरेदी खताबाबत आरोप केले होते. त्यानंतर साई रिसॉर्टवर शनिवारी (ता.१२ जून) केंद्रीय पथक दाखल झाले होते. त्यांनी या परिसराची संपूर्ण पाहणी केली, हे रिसॉर्ट अनिल परब यांच्या नावाने असून त्यांना याचा जाब द्यावाच लागेल, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले होत.  

सोमय्या यांनी रविवारी एक ट्वीट केले आहे. त्यामध्ये ते म्हटले की ''अनील परब हे "साई रिसॉर्ट दापोली" चे मालक आहेत. त्यांनी मुरुड ग्रामपंचायत कडे अर्ज करुन जमीन आपल्या नावावर हस्तांतरित करण्यास सांगितले आहे. त्यांनी विभाश साठे यांच्याकडून मालमत्ता सर्वेक्षण क्रमांक ४४६ खरेदी केली. हे अनिल परब यांना हस्तांतरित हाऊस नंबर 1074 होते. त्यांनी मालमत्ता कर व वीज उपकर 4 हजार 680 रुपये भरला आहे. त्याचा पावती क्रमांक 40 आहे.'' असे सोमय्या यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. त्या सोबतच त्यांनी कर पावती आणि अर्जही पोस्ट केला आहे. 
  
सोमय्या यांच्या तक्रारीनंतर परब यांच्या साई रिसॉर्टच्या अनधिकृत बांधकामाबाबत वस्तुस्थिती काय आहे. याची खातरजमा करण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मुरुड तालुका दापोली येथील गट क्रमांक 446 येथील साई रिसॉर्ट एनेक्सचे बांधकाम बेकायदेशीर आहे. सीआरझेड कायद्याचे (law of CRZ) उल्लंघन केले असल्याचे सोमय्या यांनी म्हटले होते. फसवणूक, दस्तावेजात खाडाखोड, करत परब यांनी पदाचा दुरुपयोग केला, असल्याचा आरोप त्यांनी केला होता. सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनंतर साई रिसॅार्टच्या अनधिकृत बांधकामाबाबत वस्तुस्थिती काय आहे. याची खातरजमा करण्याचे आदेश रत्नागिरीच्या अप्पर जिल्हाधिकारयांनी दिले होते.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख