महात्मा गांधी जिवंत असते तर गोडसेलाही माफ केलं असतं! - Dispute in congress after joining hindu mahasabha leader | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांकडून 5 हजार 400 कोटींचे पॅकेज जाहिर...
पुढील 15 दिवस संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू ठेवणार...
नोंदणीकृत घरगुती कामगारांनाही आर्थिक मदत देणार...
नोंदणीकृत फेरीवाल्यांनाही पंधराशे रुपयांची मदत मिळणार...
परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये देणार...
पुढील महिनाभर गरीबांसाठी मोफत शिवभोजन थाळी...दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मिळणार
राज्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी...मुख्यमंत्र्यांची घोषणा

महात्मा गांधी जिवंत असते तर गोडसेलाही माफ केलं असतं!

वृत्तसंस्था
रविवार, 28 फेब्रुवारी 2021

नथूराम गोडसेची पूजा करणाऱ्या नेत्याचा काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश झाला आहे.

नवी दिल्ली : नथूराम गोडसेची पूजा करणाऱ्या नेत्याचा काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश झाला आहे. त्यावरून काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. काही नेत्यांनी या प्रवेशाला जोरदार विरोध केला आहे. तर काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने या प्रवेशाचे समर्थन केले आहे. ''महात्मा गांधी जिवंत असते तर गोडसेलाही माफ केलं असतं,'' असं ट्विट करत त्यांनी चर्चेला तोंड फोडलं आहे. 

भोपाळमध्ये एका कार्यक्रमात नगरसेवक असलेले बाबूलाल चौरसिया यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. चौरसिया हे काही वर्षांपूर्वीही काँग्रेसमध्ये होते. मागील महापालिका निवडणुकीवेळी त्यांनी तिकीट न मिळाल्याने बंडखोरी केली होती. त्यानंतर त्यांनी हिंदू महासभेकडून निवडणूक लढवत जिंकलीही होती. हिंदू महासभेमध्ये गेल्यानंतर चौरसिया यांनी नथुराम गोडसेच्या मूर्तीची पूजा केली होती. त्यानंतर काही दिवसांतच चौरसिया काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या उपस्थितीत चौरसिया यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यानंतर काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे नेते मानक अग्रवाल यांनीही पहिल्याच दिवशी चौरसिया यांच्या काँग्रेस प्रवेशावर नाराजी व्यक्त केली आहे. गोडसेची पूजा करणाऱ्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देऊ नये. आम्ही त्याच्या विरोधात आहोत. कमलनाथ यांना चौरसिया यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल, म्हणून त्यांना प्रवेश देण्यात आला असावा, असे ते म्हणाले. 

हेही वाचा : नरकयातना भोगणाऱ्या 850 हून अधिक गायींची होणार कत्तल

अग्रवाल यांच्यानंतर आणखी काही नेते पुढे आले आहेत. पण काँग्रेसचे राष्ट्रीय चिटणीस उमंग सिंघर यांनी ट्विट करून या प्रवेशाचे समर्थन केले आहे. ''इंदिराजी, राजीवजी यांची हत्या करणाऱ्यांना गांधी परिवाराने माफ केलं आहे. गांधीजी जिवंत असते तर गोडसेलाही माफ केलं असतं. महात्मा गांधी अमर आहेत. गोडसेच्या विचारधारेचा त्याग करून गांधींची विचारधारा असलेल्या काँग्रेस पक्षात येणाऱ्यांचे स्वागत करायला हवे,'' असे सिंघर यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या बंधू व आमदार लक्ष्मण सिंह यांनीही या प्रवेशावर टीका केली आहे. गोडसेच्या भक्चांची जागा काँग्रेस पक्ष नव्हे तर सेंट्रल जेल आहे. गृह मंत्रालयानेही गोडसे समर्थकांच्या हालाचालींवर नजर ठेवायला हवी, असे ट्विट त्यांनी केलं आहे. 

मध्य प्रदेशचे माजी अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री अरूण यादव यांनीही चौरसिया यांच्या प्रवेशावर नाराजी व्यक्त केली. महात्मा गांधी यांची हत्या करणारे आणि गांधीवादी विचारधारेवर गप्प बसू शकत नाही. त्याबद्दल मला कोणताही दंड दिला तरी मी तयार आहे. खासदार प्रज्ञा ठाकूर यांनाही काँग्रेसमध्ये प्रवेश देणार का?, असा सवालही यादव यांनी उपस्थित केला. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख