नरकयातना भोगत असलेल्या तब्बल 850 हून अधिक गायींची होणार कत्तल...

'करीम अल्लाह' हे जहाज सुमारे 850 गायींना घेऊन डिसेंबर महिन्यात रवाना झाले होते.
Calls for killing of more than 850 cows on karim allah ship
Calls for killing of more than 850 cows on karim allah ship

कार्टेजीना (स्पेन) : मागील महिनाभरापासून नरकयातना भोगत असलेल्या तब्बल 850 गायींची कत्तल करण्यात येणार आहे. या गायी भूमध्य समुद्रातील 'करीम अल्लाह' या जहाजावर आहेत. त्यांना अनेकदा चाराही मिळत नसल्याने अनेक गायींचे आरोग्य खालावले असून 22 गायींचा मृत्यूही झाला आहे. तसेच अनेक गायींना विषाणूजन्य आजार झाल्याची भितीही व्यक्त केली जात आहे.

लेबनॉनमध्ये नोंदणी असलेले 'करीम अल्लाह' हे जहाज सुमारे 850 गायींना घेऊन डिसेंबर महिन्यात कार्टेजीना या स्पॅनिश बंदरातून तुर्कीच्या दिशेने निघाले. तुर्कीमध्ये या गायींची विक्री केली जाणार होती. मात्र, तेथील प्रशासनाने गायींना उतरवून घेण्यास नकार दिला. ब्ल्युटंग नावाच्या आजाराच्या भितीने प्रशासनाने हा निर्णय घेतला. तसेच तुर्कीने स्पेनमधून जिवंत प्राण्यांना घेऊन येण्यासही मनाई केली आहे. एका वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. 

तुर्की प्रशासनाने निकार दिल्यानंतर नवीन खरेदीदार शोधण्यास सुरूवात झाली. पण लिबियासह अनेक देशांना गायींना घेण्यास नकार दिला. त्यामुळे हे जहाज डिसेंबर महिन्यापासून भूमध्य समुद्रातच आहे. गायींचा चारा संपल्याने अनेक दिवसांपासून त्या केवळ पाण्यावरच आहेत. ट्युनिशियाकडून चारा मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्यांनीही नकार दिल्याचे टालिया शिपिंग लाईन या जहाज कंपनीचे वकील मिग्युल मॅसरमॉन यांनी सांगितले. 

अखेर हे जहाज कार्टेजीना बंदरात परतले आहे. पण स्पॅनिश सरकारनेही गायींना उतरवून घेण्यास नकार दिला आहे. मागील आठवड्यांत गायींची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांनी दिलेल्या अहवालामध्ये ब्ल्युटंग आजाराचा उल्लेख नाही. पण अनेक गायींना अस्वच्छतेमुळे बुरशीजन्य संसर्ग झाला आहे. या गायी इतर देशांतही विकल्या जाणार नाहीत. त्यामुळे त्यांना मारून टाकणे योग्य होईल, असे म्हटले आहे. जहाजावर 864 गायी असल्याचे स्पेनमधील कृषी मंत्रालयातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच 22 गायींचा मृत्यू झाला आहे. 

मॅसरमॉन यांनी तेथील अधिकाऱ्यांवर टीका केली आहे. त्यांनी गायींच्या रक्ताचे नमुने घेतलेच नाहीत. गायींवर लक्ष देण्याऐवजी ते जहाजावरच अधिक लक्ष देत आहेत. प्रशासनाने गायींच्या आरोग्याची तपासणी करण्याबाबत आश्वासन दिले होते. पण ते जात नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. तसेच त्यांनी प्रशासनाकडून गायींना मारून टाकण्यात येईल, अशी भितीही व्यक्त केली आहे. 

स्वयंसेवी संस्थांनी या गायी जहाजावर नरकयातना भोगत असल्याचे म्हटले आहे. हे जहाज प्राण्यांची वाहतूक करण्यासाठी योग्य नाही. मागील दोन महिन्यांपासून जहाजावर गायींच्या स्वच्छतेबाबत दक्षता घेण्यात आलेली दिसत नाही. त्यामुळे त्यांचे आरोग्य खालावले असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com