सेंट्रल व्हिस्टाचं बांधकाम रोखण्यास दिल्ली उच्चन्यायालयाचा नकार ; याचिकाकर्त्याला १ लाखांचा दंड

"हा राष्ट्रीय महत्त्वाचा प्रकल्प आहे." असे कोर्टाने सांगितले.
Sarkarnama Banner - 2021-05-31T113152.317.jpg
Sarkarnama Banner - 2021-05-31T113152.317.jpg

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाला  central vista project विरोध करणारी याचिका फेटाळण्यात आली आहे. याबरोबरच न्यायालयाने याचिकाकर्त्यांवर एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. delhi high court green signal of central vista project construction work during corona dismiss petition slap one lakh penalty on petitioner

कोविड काळात सुरु असलेल्या या प्रकल्पाच्या विरोधातील याचिका मुख्य न्यायाधीश डी.एन. पटेल, न्यायमूर्ती ज्योती सिंह यांच्या खंडपीठाने फेटाळली आहे. न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलं आहे की कामगार जर कामाच्या ठिकाणी सुरक्षित असतील तर तर असे काम थांबवू शकत नाही. हा प्रकल्प देशातील राष्ट्रीय महत्वाचा प्रकल्प आहे. यापूर्वी अन्या मल्होत्रा आणि सोहेल हाशमी यांच्या ता. १७ मेच्या याचिकेवरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला होता. या दोन्ही याचिकाकर्त्यांनी सांगितले होते की हा प्रकल्प आवश्यक नाही. त्याला काही काळासाठी थांबविणे गरजेचे आहे. कोरोना काळात असे प्रकल्प करण्यास मंजूरी देऊ नये, यामुळे अनेकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. 

"हा प्रकल्प नोव्हेंबर 2021 च्या आधी पूर्ण करावा लागेल. वेळ महत्वाचा आहे.  लोकांना या प्रकल्पात अत्यंत रस आहे," असं कोर्टाने म्हटलं आहे. सेंट्रल व्हिस्टा हा राष्ट्रीय महत्त्वाचा प्रकल्प आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने बांधकाम थांबविण्याची विनंती फेटाळली" हा प्रकल्प नोव्हेंबर 2021 च्या आधी पूर्ण करावा लागेल. वेळ महत्वाचा आहे. लोकांना या प्रकल्पात अत्यंत रस आहे," असं कोर्टाने म्हटलं आहे. "हा राष्ट्रीय महत्त्वाचा प्रकल्प आहे." असे कोर्टाने सांगितले.

हेही वाचा : प्रेयसीसोबत डेटिंगवर असताना मेहूल चोकसीला पकडले.. ब्राऊन यांचा खुलासा 
नवी दिल्ली :  पंजाब नॅशनल बॅक गैरव्यवहारातील आरोपी व  हिऱ्यांचा मेहुल चोकसी सध्या डोमिनिकाच्या रूग्णालयात आहे. त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्याला डोमिनिकाच्या चायना फ्रेंडशीप हॅास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.  त्याचे वकील अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे. पण मेहूल चोकसीचे भारत प्रत्यार्पण सध्या लांबणीवर पडले असल्याची सध्याची परिस्थिती आहे. व्यापारी मेहुल चोकसी  mehul choksi याच्या प्रत्यार्पणास भारताच्या  प्रयत्नास धक्का बसला आहे. कारण डॅामिनिका न्यायालयाने त्यांच्या प्रत्यार्पणास नकार दिला आहे. मेहुल चोकसी यांच्या वकिलांनी प्रत्यार्पणाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याचे अपहरण करणारे दोन भारतीय एजंट भंडल गुरजीत आणि सिंह गुरमीत यांनी डोमिनिका सोडले आहे. डोमिनिकाचे पंतप्रधान गैस्टन ब्राऊन यांनी मेहूल चोकसीबाबत अजून एक नवीन खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं की, चोकसी हा आपली प्रेयसीसोबत जेवण्यासाठी व फिरण्यासाठी एँटिगुआ येथून शेजारील देश डोमिनिका येथे बोटीनं आला होता. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला भारताच्या हवाली करता येईल. कारण तो एक भारतीय नागरिक आहे. एँटिगुआचे त्यांने तात्पुरते नागरिकत्व स्वीकारले आहे त्यामुळे त्याला एँटिगुआला प्रत्यार्पण करता येणार नाही. चोकसी प्रत्यापर्ण साठी भारताचे विमान आवश्यक कागदपत्र घेऊन डोमिनिका येथे आले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com