प्रेयसीसोबत डेटिंगवर असताना मेहूल चोकसीला पकडले.. ब्राऊन यांचा खुलासा

मेहूल चोकसीचे भारत प्रत्यार्पण सध्या लांबणीवर पडले आहे.
11Sarkarnama_20Banner_20_202021_05_27T125429.605.jpg
11Sarkarnama_20Banner_20_202021_05_27T125429.605.jpg

नवी दिल्ली :  पंजाब नॅशनल बॅक गैरव्यवहारातील आरोपी व  हिऱ्यांचा मेहुल चोकसी सध्या डोमिनिकाच्या रूग्णालयात आहे. त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्याला डोमिनिकाच्या चायना फ्रेंडशीप हॅास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.  त्याचे वकील अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे. पण मेहूल चोकसीचे भारत प्रत्यार्पण सध्या लांबणीवर पडले असल्याची सध्याची परिस्थिती आहे. mehul choksi admitted to hospital in dominica possibility of extradition to india decreased

व्यापारी मेहुल चोकसी  mehul choksi याच्या प्रत्यार्पणास भारताच्या  प्रयत्नास धक्का बसला आहे. कारण डॅामिनिका न्यायालयाने त्यांच्या प्रत्यार्पणास नकार दिला आहे. मेहुल चोकसी यांच्या वकिलांनी प्रत्यार्पणाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याचे अपहरण करणारे दोन भारतीय एजंट भंडल गुरजीत आणि सिंह गुरमीत यांनी डोमिनिका सोडले आहे. 

डोमिनिकाचे पंतप्रधान गैस्टन ब्राऊन यांनी मेहूल चोकसीबाबत अजून एक नवीन खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं की, चोकसी हा आपली प्रेयसीसोबत जेवण्यासाठी व फिरण्यासाठी एँटिगुआ येथून शेजारील देश डोमिनिका येथे बोटीनं आला होता. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला भारताच्या हवाली करता येईल. कारण तो एक भारतीय नागरिक आहे. एँटिगुआचे त्यांने तात्पुरते नागरिकत्व स्वीकारले आहे त्यामुळे त्याला एँटिगुआला प्रत्यार्पण करता येणार नाही. चोकसी प्रत्यापर्ण साठी भारताचे विमान आवश्यक कागदपत्र घेऊन डोमिनिका येथे आले आहे.  

मेहूल चोकसीचे वकील वेन मार्श यांनी सांगितले की मेहूल यांनी कुठलाही कायदा मोडलेला नाही. त्यामुळे त्यांना न्याय मिळाला पाहिजे. मेहूल चोकसी यांना मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्या डोळ्यांना सूज आली असून शरिरावर अनेक ठिकाणी जळल्याचे डाग दिसत आहेत. तर दुसरे वकील विजय अग्रवाल म्हणाले की मेहूल यांना जॅाली हार्बर येथील काही जणांनी अपहरण केले होते. त्यांची कार मिळाली आहे. त्यांना डॅामिनिका येथे नेण्यात आले आहे. 

पंजाब नॅशनल बॅक गैरव्यवहारातील आरोपी व  हिऱ्यांचा व्यापारी मेहुल चोकसी  याला काल डॅामिनिका देशात अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेबाबत इंटरपोलने सीबीआयला कळविलं आहे.  "मेहुल चोकसीला आमच्याकडे पाठवू नका, त्याला थेट भारतात पाठवा," असे एंटीगुआ आणि बारबुडाचे पंतप्रधान गॅस्टॅान ब्राऊन यांनी डॅामिनिकाच्या प्रशासनाला सांगितले आहे. 
  
सध्या मेहुल हा डॅामिनिका पोलिसांच्या ताब्यात आहे. तो कारागृहात असल्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी सांगितले की चोकसीला दक्षिण डॅामिनिका येथून पकडण्यात आले. या ठिकाणी एकही विमानतळ नाही, चोकशी हा या ठिकाणी बोटीतून आला असावा. त्याला कैनफील्ड येथील किनाऱ्यावर पकडण्यात आले.  ज्यावेळी मेहुल चोकसीला पकडण्यात आले तेव्हा तो समुद्रात महत्वाची कागदपत्रे नष्ट करीत होता. हे डॅामिनिका पोलिसांनी पाहिले असता, त्यांना संशय आला. पोलिसांनी यांनी त्याला याबाबत विचारले असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. मेहुल चोकसी या बोटीतून डॅामिनिका येथे आला होता. तेथून तो क्यूबा येथे पळून जाण्याच्या बेतात होता, असे चैाकशीत आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com