यास धडकले; ओडिशा, बंगाल किनारपट्टीवर जलप्रलय...अनेक गावे पाण्याखाली

तोक्ते वादळाप्रमाणेच यास चक्रीवादळानेही रौद्र रुप धारण केलं आहे.
CycloneYaas crossed north Odisha coast landfall at morning
CycloneYaas crossed north Odisha coast landfall at morning

भूवनेश्वर : बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) निर्माण झालेल्या यास चक्रीवादळाने आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ओडिशाच्या किनारपट्टीला धडक दिली. त्यामुळं किनारपट्टीलगत अतिवृष्टी सुरू असून समुद्राचे पाणीही काही गावांमध्ये घुसले आहे. वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पश्चिम बंगालच्या काही जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस सुरू आहे. (CycloneYaas crossed north Odisha coast landfall at morning)

तोक्ते वादळाप्रमाणेच यास चक्रीवादळानेही रौद्र रुप धारण केलं आहे. हे वादळ आज दुपारी ओडिशाच्या किनारपट्टीला धडकेल, असा अंदाज हवामान विभागाने वतर्वला होता. पण आज सकाळी सव्वा नऊ वाजता वादळाचा केंद्रबिंदू किनारपट्टीला धडकला. अजूनही ही प्रक्रिया सुरू असून काही मिनिटांमध्ये हा केंद्रबिंदू पुर्णपणे जमीनीवर आलेला असेल. त्यानंतर वादळाची तीव्रता काही प्रमाणात कमी होऊ लागेल. 

यास चक्रीवादळाचा तडाखा ओडिशा व बंगालला काल रात्रीपासूनच बसत आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. बंगालमध्ये काही रात्री वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला. तसेच वादळी वाऱ्याने काही भागात झाडे पडली तसेच घरांचे छप्परही उडून गेले. त्यानंतर वाऱ्यांचा वेग आणि पाऊसही वाढत गेला. चक्रीवादळ किनारपट्टीला धडकल्यानंतर वाऱ्याचा वेग ताशी १३० ते १४० किमी एवढा होता. तर तो ताशी १५५ पर्यंत वाढल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. 

चक्रीवादळाने किनारपट्टी लगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अनेक गावे पाण्याखाली गेली आहे. चक्रीवादळ अधिक भयंकर होण्याची शक्यता आधीच व्यक्त करण्यात आल्याने ओडिशा किनारपट्टीलगतच्या ८ ते ९ लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. तसेच बंगालमधील लाखो लोकांना हलवण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ओडिशामध्ये बालारोस व भद्रक या दोन जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. 

उद्या सकाळी झारखंडमध्ये

यास चक्रीवादळ उद्या सकाळी झारखंड राज्यात पोहचण्याची शक्यता आहे. हे वादळ मध्यरात्री ओडिशाची सीमा ओलांडून झारखंडमध्ये प्रवेश करेल. मात्र, तोपर्यंत वादळाची तीव्रता कमी होत जाईल, असे हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे. झारखंडमध्ये जोरदार वारे वाहत असून मुसळधार पावसालाही सुरूवात झाली आहे. बिहारमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com