"त्यांचा बापही मला अटक करु शकत नाही.." रामदेव बाबांचे पुन्हा वादग्रस्त विधान..नेटकऱ्यांकडून ट्रोल

नरेंद्र मोदी यांच्यासोबत रामदेव बाबा यांची जवळीक असल्याने ते अशा प्रकारचे विधान करीत आहेत.
"त्यांचा बापही मला अटक करु शकत नाही.." रामदेव बाबांचे पुन्हा वादग्रस्त विधान..नेटकऱ्यांकडून ट्रोल
Sarkarnama Banner - 2021-05-26T125157.132.jpg

नवी दिल्ली : दोन दिवसापूर्वी पतंजली आयुर्वेदचे सर्वेसर्वा योगगुरु रामदेव बाबा  Ramdev Baba यांनी  व्हॅाट्सअॅपरील एक मेसेज वाचून दाखवताना त्यांनी अॅलोपॅथी उपचार पध्दतीला फालतू म्हटले होतं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टिकेची झोड उठली. आता पुन्हा रामदेव बाबांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (IMA) विरोधात वादग्रस्त व्यक्तव्य केलं आहे. त्यांच्यावर नेटकऱ्यांनी हल्लाबोल केला आहे.  trending news baba ramdev vs ima latest comment

काही ठिकाणी डॅाक्टरांनी पतंजलीच्या विरोधात आंदोलन केले आहे. सोशल मीडियावर रामदेव बाबा यांच्याविरोधात मोहिम सुरु आहे. त्यांना अटक करण्याची मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. या दरम्यान सोशल मीडियावर रामदेव बाबा यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावरही टीका होत आहे. आयएमएने त्यांनी अटक करण्याची मागणी केली आहे, त्यावर प्रतिक्रिया देताना रामदेव बाबांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, त्यांचा बापही मला अटक करु शकत नाही.नेटकऱ्यांनी त्यावर हल्लाबोल केला आहे, रामदेव बाबा सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. एक युजर्स म्हणतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत रामदेव बाबा यांची जवळीक असल्याने ते अशा प्रकारचे विधान करीत आहेत.  

इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॅा. हर्षवर्धन यांनीही त्यावर नाराजी व्यक्त करत खरमरीत पत्र लिहिलं आहे.  आयएमएने रामदेव बाबा यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रामदेव बाबा यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले की, अॅलोपॅथीवर टीका करणारे बाबा रामदेव यांच्या ऐवजी दुसरे कोणी काही बोललं असतं तर भाजपने रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केले असतं. 
 
रामदेव बाबा Ramdev Baba यांनी अॅलोपॅली उपचार पद्धतीला फालतू म्हटलं होते. त्यावरुन देशभरात अॅलोपॅथीच्या डॅाक्टरांनी रामदेव बाबा यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली होती. आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी नाराजी व्यक्त करुन त्यांना खरमरतीत पत्र लिहिलं होते. त्या पत्राला  रामदेव बाबा यांनी उत्तर दिले आहे. मी माझे विधान मागे घेतो, असं त्यांनी म्हटलं आहे. 
  रामदेव बाबा यांनी टि्वट करीत हर्षवर्धन यांच्या पत्राला उत्तर दिलं आहे. ते आपल्या पत्रात म्हणतात की,  “हे प्रकरण शांत करायचं आहे. डॉ. हर्ष वर्धन, आपले पत्र आले. त्यासंदर्भात, वैद्यकीय पद्धतींच्या संपूर्ण विवादास विराम देऊन मी माझे विधान मागे घेतो. मी हे पत्र तुम्हाला पाठवत आहे.”  

 
 Edited by : Mangesh Mahale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in