उत्तर प्रदेशमध्ये कोरोना कहर; अखिलेश यादवही कोरोना पॉझिटिव्ह 

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नंतर अखिलेश यादवही कोरोना पाॅझिटिव्ह.
 Akhilesh Yadav .jpg
Akhilesh Yadav .jpg

लखनौ : उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ Yogi Adityanath कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत. आपण स्वतः होम क्वारंटाईन असल्याची माहिती स्वतः योगी आदित्यनाथ यांनीच ट्वीट Tweet करुन दिली आहे. त्यानंतर आता उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री  अखिलेश यादवही कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 

अखिलेश यादव यांनी ट्वीट करत आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याचे म्हटले आहे. आपण स्वतःला क्वारंटाईन करुन घेतले असल्याचे यादव म्हणाले आहेत, तसेच मागील काही दिवसात आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी असेही अखिलेश यादव यांनी सांगितले आहे.

देशामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दररोज दीड लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. आरोग्य व्यवस्था अनेक ठिकाणी कोलमडली असल्याचे पाह्याला मिळत आहे. सरकारकडून कठोर निर्बंध लागू केले जात आहेत. नागरिकांना गर्दी करण्यास मज्जाव करण्यात येत आहे.

देशातील अनेक राज्यांमध्यो कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यातच आता उत्तर प्रदेशचीही भर पडत आहे. योगी आदित्यनाथ हे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील साधू संत व धर्माचार्याची व्हीडीअो कॅान्फरन्स आयोजित करण्यात आली होती. त्यात बोलतांना योगींनी कोरोनाला आळा घालण्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी प्राधान्य दिले पाहिजे असे सांगितले होते.

अशा परिस्थितीत यात्रा, राजकीय मेळाव्यांसह धार्मीक ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. हरिद्वार Haridwar येथे कुंभमेळ्यात झालेल्या गर्दीची सर्वत्रच जोरदार चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणताही धर्म असो त्यातील आस्थेपेक्षा माणूस महत्वाचा, असल्याचे म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com