महाराष्ट्र राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करू द्या - राज ठाकरेंचे पंतप्रधानांना पत्र

आज सारा देश कोविड १९ च्या साथीला तोंड देत असताना महाराष्ट्रातील स्थिती सर्वात बिकट आहे, ही स्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती करणारे पत्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.
Raj Thackeray Writes letter to PM Narendra Modi
Raj Thackeray Writes letter to PM Narendra Modi

मुंबई : आज सारा देश कोविड १९ Corona च्या साथीला तोंड देत असताना महाराष्ट्रातील स्थिती सर्वात बिकट आहे, ही स्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्याला स्वतंत्रपणे लस Vaccine खरेदी करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती करणारे पत्र मनसे MNS प्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांना लिहिले आहे. MNS Chief Raj Thackeray Wrote Letter to PM Narendra Modi

गेल्या वर्षी कोविड १९ ची साथ सुरु झाल्यानंतर राज्याला या साथीचा सर्वाधिक फटका बसला. देशातल्या पहिल्या काही रुग्णांपैकी काही महाराष्ट्रात Maharashtra आढळले होते. तेव्हापासून महाराष्ट्रात निव्वळ आकड्यांमध्ये मोजल्यास सर्वाधिक रुग्ण आणि दुर्दैवाने सर्वाधिक मृत्यू देखील झाले आहेत, असे राज यांनी या पत्रात नमूद केले आहे.

''कोविडची पहिली लाट व त्यानंतरचा लाॅकडाऊन Lock Down यामुळे महाराष्ट्रातल्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. याचे आर्थिक सामाजिक पडसाद देशभर पडलेले आपण पाहतो आहोत. नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, टाळेबंदी जाहीर करणे महाराष्ट्राला परवडणारे नाही. पण राज्याला पुरेशा लसी मिळतच नसतील तर पर्याय तरी काय उरतो?या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या संसर्गाला तोंड द्यायचे असेल तर १०० टक्के लसीकरण Corona Vaccination करण्याची रणनिती महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे राज्यातल्या सर्व वयोगटातल्या १०० टक्के लोकांचे लसीकरण लवकरात लवकर करायला हवं.यासाठी महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लसी खरेदी करुन द्याव्या,'' असे राज यांनी या पत्रात म्हटले आहे. MNS Chief Raj Thackeray Wrote Letter to PM Narendra Modi

या पत्रात राज ठाकरे म्हणतात...
-राज्यातल्या खासगी संस्थांनाही लसी खरेदी करता याव्यात

-सिरमला महाराष्ट्रात मुक्तपणे पण योग्य नियमन करुन लस विक्रीची परवानगी द्यावी

-महाराष्ट्रातल्या इतर संस्थांना उदा. हाफकिन व हिंदुस्तान अँटिबायोटिक, लस उत्पादन करण्याची परवानगी द्यावी

-कोविडचा उपचार करण्यासाठी रेमडिसिवीर, आॅक्सिजन याचा पुरवठा राज्यात असावा यासाठी राज्याला आवश्यक पावले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी

-आरोग्य हा विषय राज्याचा आहे. साथीला नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक राज्याला तिथल्या स्थानिक परिस्थितीनुसार धोरण आखण्याची गरज आहे. म्हणून केंद्राने राज्याला केवळ परवानगीच नाही तर स्थानिक परिस्थितीला अनुसरून योग्य ती उपाययोजना आखण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com