काँग्रेसकडून ममता बॅनर्जींना मोठं गिफ्ट! दिल्लीतील भेटीगाठींनी केलं काम

केंद्रीय निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालमधील तीन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूका जाहीर केल्या आहेत.
Congress not to field any candidate against Mamata Banerjee
Congress not to field any candidate against Mamata Banerjee

कोलकाता : भाजपकडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडलेली असताना काँग्रेसनं त्यांना मोठा दिलासा दिला आहे. ममता बॅनर्जी या भवानीपूर मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणार आहेत. या निवडणुकीत काँग्रेसकडून त्यांच्याविरोधात उमेदवार उभा न करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. (Congress not to field any candidate against Mamata Banerjee)

केंद्रीय निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालमधील तीन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूका जाहीर केल्या आहेत. मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी ममतांना ही निवडणूक जिंकावीच लागेल. तर भाजपनंही त्यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. ममतादीदींनी उमेदवारी अर्ज भरण्याआधीच भाजपनं आपला पहिला डाव टाकला आहे. तर दुसरीकडं काँग्रेसनं आधी म्हटल्याप्रमाणं आपली भूमिका मांडली आहे. 

काँग्रेसकडून भवानीपूर मतदारसंघात ममतांविरोधात उमेदवार दिला जाणार नाही, असं काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी चौधरी यांनीही अशीच भूमिका मांडली होती. पण निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर त्यांनी यु-टर्न घेत याबाबत पुन्हा विचार करावा लागेल, असं वक्तव्य सोमवारी केलं होतं. त्यामुळं काँग्रेस उमेदवार देणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. संसद अधिवेशन काळात ममतांनी दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. 

दरम्यान, भाजपच्या शिष्टमंडळाने मंगळवारी निवडणूक आयोगाकडं ममता बॅनर्जी यांच्याविरोधात तक्रार केली आहे. त्यांनी आचारसंहिता लागू झाल्यानंतर दुर्गा पूजा समित्यांसाठी रोख रकमेच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. हा आचारसंहितेचा भंग असल्यानं त्यांना निवडणूक लढवण्यापासून रोखत कारवाई करावी, अशी मागणी भाजपनं आयोगाकडं केली आहे. आता आयोगाकडून यावर कोणाता निर्णय घेतला जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. 

बंगाल सरकारनं मंगळवारी राज्यातील दुर्गा पूजा समित्यांना यावर्षी 50 हजार रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा केली आहे. कोरोना संकटामुळं दुर्गा पूजा उत्सव साजरा करण्यात अनेक आर्थिक अडचणी येत आहेत. बंगालमध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यामुळं हे अनुदान दिले जाणार असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com