आमदार घोड्यावर बसून आल्या विधानसभेत; कारणही आहे हटके...

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. अनेक राज्यांमध्ये पेट्रोलच्या दरांनी शंभरी पार केलेली आहे.
Congress MLA Amba Prasad arrives at the Assembly riding a horse
Congress MLA Amba Prasad arrives at the Assembly riding a horse

रांची : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. अनेक राज्यांमध्ये पेट्रोलच्या दरांनी शंभरी पार केलेली आहे. याचा निषेध करण्यासाठी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांकडून ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. कुणी सायकलवर बसून तर कुणी ई-स्कूटरवरून विधानसभा गाठत आहे. पण काँग्रेसच्या एका महिला आमदाराने आज चक्क घोड्यावर बसून विधानसभेत प्रवेश केला. 

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजनेचे सहाय्यक लेखाधिकारी सतीश पंजाबराव देशमुख यांनी नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कार्यालयीन वेळेत घोडा बांधण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांना मागितली होती. पण ती पेट्रोलच्या वाढलेल्या दरांमुळे नव्हे तर पाठीच्या कण्याचा त्रास होत असल्यामुळे.पण जिल्हाधिकाऱ्यांनी तंबी दिल्यानंतर ही मागणी मागे घेण्यात आली.  या अधिकाऱ्याच्या या अजब मागणीची राज्यभर जोरदार चर्चा झाली. 

आज झारखंडमधील काँग्रेसच्या आमदार अंबा प्रसाद घोड्यावर बसून विधानसभेत आल्या. पण त्यामागे इंधन दरवाढ हे कारण नव्हते. आज जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून त्यांनी घोड्यावर विधानसभा गाठल्याचे सांगितले. महिला दिन साजरा करण्यासाठी घोड्यावर आल्याचे त्या म्हणाल्या. हा घोडा त्यांना भेटस्वरूपात मिळाला आहे. महिला दिनानिमित्त कर्नल (निवृत्त) रवि राठोड यांनी हा घोडा दिल्याचे त्यांनी सांगितले. 

आमदार अंबा प्रसाद घोड्यावर बसून विधानसभेत आल्यानंतर नागरिकही अवाक झाले. ते अनेक वेळ त्यांच्याकडे पाहतच राहिले. या प्रकारामुळे विधानससभा परिसरातील सुरक्षारक्षकही गोंधळून गेले. पण त्या फारकाळ तिथे थांबल्या नाहीत. 

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com