राहुल गांधींचा अनोखा अंदाज; म्हणींमधून केंद्र सरकारला टोला...

काँग्रेसचे नेते राहुल गांधी दररोज ट्विटरवरून केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करतात.
Congress leader Rahul Gandhi slams government over it raid
Congress leader Rahul Gandhi slams government over it raid

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी दररोज ट्विटरवरून केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करतात. आज त्यांनी तीन म्हणींचा आधार घेत सरकारला धारेवर धरलं आहे. ईडी, आयटी, सीबीआयची रेड, शेतकरी व समर्थकांवरील रेड यावर भाष्य केले आहे. 

राहुल गांधींनी आज केलेल्या ट्विटमध्ये तीन हिंदी म्हणींचा उल्लेख केला आहे. 'उँगलियों पर नचाना' या म्हणीचे स्पष्टीकरण देताना त्यांनी केंद्र सरकार आयटी विभाग, ईडी आणि सीबीआयला बोटांवर नाचवत असल्याचा अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. 

'भीगी बिल्ली बनना' या दुसऱ्या म्हणीचा आधार त्यांनी घेतला आहे. या म्हणीचा अर्थ सांगताना त्यांनी केंद्र सरकार के सामने मित्र मीडिया असे म्हटलं आहे. तर 'खिसियानी बिल्ली खंबा नोचे' ही तिसरी या तिसऱ्या म्हणीच्या आधारेही त्यांनी सरकारवर टीका केली आहे. या म्हणीचा अर्थ सांगताना ते म्हणाले, जसे केंद्र सरकार शेतकरी आणि समर्थकांवर रेड करते. 

या म्हणीनंतर राहुल गांधी यांनी #ModiRaidsProFarmers हा हॅशटॅक वापरला आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या घरांवर आयटी विभागाने काल रेड टाकली आहे. या दोघांनी शेतकरी आंदोलनाला समर्थन देत सरकारवर टीका केली आहे. कर न भरल्याच्या आरोपांवरून त्यांच्यावर कारवाई केल्याचे बोलले जात आहे. या कारवाईनंतर सोशल मीडियावर #ModiRaidsProFarmers हा ट्रेंड सुरू आहे. 

मुंबई आणि पुण्यातील 20 हून अधिक ठिकाणांवर काल आयटी विभागाने छापे टाकले आहे. कश्यप आणि तापसी यांच्या पुण्यातील एका हॉटेलवरही चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्या मोबाईल व लॅपटॉपही ताब्यात घेतल्याचे समजते. या छापेमारीनंतर त्यावर टीका सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना समर्थन करणाऱ्यांना सरकार जाणीवपूर्वक लक्ष्य करत असून त्यासाठी तपास यंत्रणांचा दुरूपयोग केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com