राज्यपालांनी केला लैंगिक छळ; न्यूयॉर्कमधील तीन महिलांचा आरोप

लैंगिक छळाच्या आरोपानंतर झिम्बाब्वेच्या उपाध्यक्षांना नुकताच राजीनामा द्यावा लागला आहे.
Three women accusations of sexual harassment against Andrew Cuomo
Three women accusations of sexual harassment against Andrew Cuomo

न्यूयॉर्क : न्यूयॉर्कचे राज्यपाल अँड्र्यू कुओमो यांच्यावर तीन महिलांनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. या आरोपांनंतर कुमो यांनी लैंगिक छळाचे आरोप फेटाळून लावले आहेत. मी कधीही महिलांना वाईट भावनेतून स्पर्श केला नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच संबंधित महिलांबद्दल दिलगिरीही व्यक्त केली. 

लैंगिक छळाच्या आरोपानंतर झिम्बाब्वेच्या उपाध्यक्षांना नुकताच राजीनामा द्यावा लागला आहे. कुओमो यांच्यावर मागील काही दिवसांत एका पाठोपाठ एक तीन महिलांनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. न्यूयॉर्कच्या अॅटर्नी जनरल यांनी या आरोपांची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे कुमो यांनी नागरिकांना तथ्य समोर येईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढू नये, असे आवाहन केले आहे. 

कुओमो यांच्या माजी उच्चस्तरीय सहयोगी महिलेने त्यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांनी आपल्याला संमतीशिवाय स्पर्श केला. तसेच आपल्याकडे बघून आक्षेपार्ह भाष्यही केले. कुओमो यांच्या दुसऱ्या एका सहकारी महिलेने न्यूयॉर्क टाईम्सशी बोलताना सांगितले की, राज्यपालांनी लैंगिक संबंधांबद्दल वैयक्तिक प्रश्न विचारले. त्यांना माझ्याशी शारिरीक संबंध ठेवायचे होते. एका छायाचित्रकार महिलेने कुओमो यांनी आपल्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. 

हा प्रकार समोर आल्यानंतर न्यूयॉर्कमध्ये कुओमो यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. कुओमो यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. याविषयी बोलताना कुओमो म्हणाले की, लोकांची गळाभेट घेणे आणि चुंबन घेणे हा अभिवादनाचा एक भाग आहे. त्यामागचा माझा हेतू चांगलाच असतो. पण यातून एक महत्वाचा धडा शिकलो आहे. महिलांना त्यामुळे आपण गैरवर्तन केल्याचे वाटत असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. 

महिलांनी आपल्या हक्कासाठी पुढे येण्याला माझे पूर्ण समर्थन आहे. त्यासाठी त्यांना सर्वप्रकारे प्रोत्साहन द्यायला हवे. पण कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहचण्यापूर्वी तथ्य समोर येण्याची वाट पहा, असे वाहानही कुओमो यांनी केले आहे.

दरम्यान, कुओमो हे न्यूयॉर्कमधील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या संख्येवरूनही वादात अडकले होते. केअर होम्समधील सुमारे 15000 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पण प्रत्यक्षात आरोग्य विभागाकडे जानेवारीपर्यंत केवळ 8500 मृत्यूचीच नोंद आहे. अॅटर्नी जनरलने याबाबत तपासणी केल्यानंतर ही तफावत समोर आली होती. देशातील हे सर्वाधिक मृत्यू आहेत. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com