काँग्रेसमुळंच पेट्रोल-डिझेलची दरवाढ; पेट्रोलियम मंत्र्यांचा जावईशोध

सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पट्रोल-डिझेलच्या भाववाढीमुळे नागरिक संकटात सापडले आहेत.
Congress had left Oil bonds worth crores for repayment says Dharmendra Pradhan
Congress had left Oil bonds worth crores for repayment says Dharmendra Pradhan

नवी दिल्ली : देशात दररोज पेट्रोल व डिझेलचे दर दररोज वाढत चाललेले असताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची भूमिकाही बदलत चालली आहे. सुरूवातीला आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने इंधन दरवाढ होत असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर हिवाळा, कल्याणकारी योजना, कोरोना काळात झालेला खर्च याकडे बोट दाखवण्यात आले. आता केंद्रीय मंत्र्यांची गाडी काँग्रेसवर घसरली आहे.  

सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) भाववाढीमुळे नागरिक संकटात सापडले आहेत. आधीच कोरोना महामारीमुळे हैराण झालेल्या नागरिकांचे या दरवाढीमुळे हाल होत आहेत. अशातच आता केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्याकडे वेगवेगळी वक्तव्य केली जात आहेत. आज त्यांनी थेट काँग्रेसला या दरवाढीसाठी जबाबदार ठरवले.

प्रधान म्हणाले, काँग्रेसच्या सरकारने कोट्यवधी रुपयांचे इंधन बाँड्स परतफेड करण्यासाठी ठेवले आहेत. सध्या भाजप सरकारला मुदद्ल आणि व्याज दोन्ही द्यावे लागत आहे. इंधन दरवाढीसाठी हेही एक मोठे कारण आहे, असे म्हणत प्रधान यांनी काँग्रेस सरकारला जबाबदार धरले. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढत आहेत. भारताला 80 टक्के इंधन आयात करावे लागत आहे,' असेही प्रधान म्हणाले. 

देशात मागील 50 दिवसांत 28 वेळा इंधनाचे दर वाढले आहेत. अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर शंभरीच्या पुढे गेले आहेत. त्यामुळं केंद्र सरकारवर जोरदार टीका होत आहे. काँग्रेसकडून काही दिवसांपूर्वी देशभरात आंदोलनही करण्यात आले. यापार्श्वभूमीवर प्रधान यांच्याकडून सातत्याने वेगवेगळी वक्तव्य येत आहेत. 

मागील आठवड्यातील प्रधान यांचं वक्तव्य

इंधन दरवाढीमुळे जनसामान्यांचे हाल होत आहेत. पण एका वर्षात कोरोना प्रतिबंधक लसीकरणावर ३५ हजार कोटींहून अधिक खर्च झाला आहे. गरीबांना आठ महिन्यांचा किराणा मोफत देण्यासाठीच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेवर एक लाख कोटी रुपये खर्च झाले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम पाठवण्यात आली. तसेच शेतकऱ्यांसाठी तांदूळ आणि गव्हाच्या MSP ची घोषणा करण्यात आली. त्याशिवाय देशात रोजगारासाठी आणि विकासकामांसाठी पैशांची गरज आहे. अशावेळी आम्ही पैसे वाचवून ते पैसे लोककल्याणासाठी वापरत असल्याचे प्रधान यांनी सांगितले होते.

फेब्रुवारी महिन्यातील प्रधान यांचं वक्तव्य

आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढल्याने देशातील ग्राहकांनाही त्याची झळ पोहचत आहे. हिवाळा संपल्यानंतर दर काही प्रमाणात कमी होतील. आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाची मागणी वाढल्याने दरवाढ वाढले आहेत. हिवाळ्यामध्ये हे असे होतेच. दर कमी होतील, असे वक्तव्य प्रधान यांनी केलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com