प्रशांत किशोर यांच्या प्रवेशाआधीच काँग्रेसमध्ये पडले दोन गट

किशोर यांना काँग्रेसमध्ये मोठी भूमिका बजावण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
Congress is divided over the issue of including Prashant Kishor
Congress is divided over the issue of including Prashant Kishor

नवी दिल्ली : राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी जुलै महिन्यात काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधींची (Priyanka Gandhi) घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती. ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पण त्यांच्या प्रवेशाआधीच काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचं वृत्त आहे. (Congress is divided over the issue of including Prashant Kishor)

किशोर यांची गांधी परिवारासोबतच्या बैठका केवळ पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यांतील विधानसभा निवडणुकांपुरती मर्यादित नव्हती. यामागे मोठे कारण आहे. किशोर यांना काँग्रेसमध्ये मोठी भूमिका बजावण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. काँग्रेस पक्ष 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी करू लागला आहे. यात किशोर हे महत्वाची भूमिका बजावतील, असे सूत्रांनी सांगितले.

किशोर यांना काँग्रेसमध्ये घेतल्यास मोठं पद द्यावं लागेल. यावर सोनिया गांधी याच अंतिम निर्णय घेतील. त्याबाबत त्यांनी अनेक वरिष्ठ नेत्यांशीही चर्चा केल्याचं सुत्रांनी सांगितलं. पण यावरून आता काँग्रेसमध्येच दोन गट पडले आहेत. जी 23 गटातील ज्येष्ठ नेत्यांनी किशोर यांच्या प्रवेशावर आक्षेप घेतला आहे. अनेक नेत्यांनी नुकतीच कपिल सिब्बल यांची भेट घेत किशोर यांच्या प्रवेशाबाबत चर्चा केल्याचं समजतं. 

तर दुसरीकडे काही काँग्रेस नेते किशोर यांना पक्षात घेण्याच्या बाजूने आहेत. किशोर यांनी काम केलेल्या पक्षांना आपल्या रणनीतीने नुकतीच पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूमध्ये निवडणूक जिंकून दिली आहे. तसेच त्यांचं या क्षेत्रातील अनुभवाचा पक्षाला 2024 च्या निवडणुकीत फायदा होईल, असं या नेत्यांचं म्हणणं आहे. राहुल गांधी व प्रियांका गांधी यांचाही किशोर यांना विरोध नाही. मागील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी किशोर यांच्यासोबत काम केलं आहे. 

या निवडणुकीत काँग्रेस व समाजवादी पक्ष चमत्कार करू शकला नाही, असं सांगत काही नेत्यांनी किशोर यांच्या अपयशावरही बोट ठेवलं आहे. किशोर यांचं यश हे मर्यादित असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केल्याचं समजते. त्यामुळं अद्याप त्यांच्या प्रवेशावर निर्णय होऊ शकलेला नाही. आता सोनिया गांधी या किशोर यांच्या प्रवेशावर काय निर्णय घेणार, याकडे काँग्रेस नेत्यांचं लक्ष लागलं आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com