चिंतन शिबीरात नेत्यांना डावलल्यानं भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर

शिबीरासाठी काही माजी आमदार नेत्यांना निमंत्रणच देण्यात आलेलं नाही.
Rumblings in BJP over exclusion of leaders from conclave in chattisgarh
Rumblings in BJP over exclusion of leaders from conclave in chattisgarh

रायपूर : छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदावरून अद्यापही वाद सुरू आहे. त्यातच आता प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपमधील मतभेदही चव्हाट्यावर आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आयोजित चिंतन शिबीरात डावलल्यानं माजी आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत केंद्रीय नेतृत्वाकडं तक्रार करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. (Rumblings in BJP over exclusion of leaders from conclave in chattisgarh)

बस्तर येथे भाजपचे तीन दिवसीय चिंतन शिबीर सुरू आहे. हे शिबीर मंगळवारपासून सुरू झाले आहे. पण या शिबीरासाठी काही माजी आमदार नेत्यांना निमंत्रणच देण्यात आलेलं नाही. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. छत्तीसगढमधील विधानसभेच्या निवडणुका 2023 मध्ये होणार आहेत. त्यासाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यासाठीच या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. 

शिबीरात न बोलवल्यावरून एका माजी आमदाराने नाराजी व्यक्त केली. शिबीरासाठी पक्षानं मला निमंत्रित का केलं नाही, याची कल्पना नाही. माझ्यासह इतर नेत्यांना अशी वागणूक का दिली, याविषयी केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. आणखी एका नेत्यानं आपल्याला डावलून पक्षाने मोठी चूक केल्याचं सांगितलं. 

माजी आमदार आणि काही स्थानिक नेत्यांना डावलून पक्ष गट पाडत आहे. त्याचा फटका पक्षाला बसेल. असा दुजाभाव केला जात असल्यानं केंद्रीय नेतृत्वाशी बोलणार असल्याचंही या नेत्यानं सांगितलं. या शिबीराला भाजपचे छत्तीसगड प्रभारी डी. पुरंदेश्वरी, केंद्रीय मंत्री रेणुका सिंग आणि माजी मुख्यमंत्री रमण सिंग आदी बडे नेते उपस्थित होते. छत्तीसगडमध्ये भाजप 2018 पर्यंत सलग 15 वर्षे सत्तेत होतं.

भाजपचं शिबीर सुरू असलेल्या बस्तर या भागामध्ये 12 पैकी भाजपचा केवळ एक आमदार आहे. या भागात आदिवासींची संख्या सर्वाधिक आहे. 12 पैकी 11 जागा आदिवासींसाठी राखीव आहेत. आदीवासींची राज्यातील संख्या 32 टक्के एवढी आहे. त्यामुळं नेत्यांना नाराज करणं आगामी निवडणुकीच्यादृष्टीनं भाजपला परवडणारं नाही. यावर भाजपचे नेते सच्चिदानंद उपासने यांनी प्रत्येक नेता पक्षासाठी महत्वाचा असल्याचं सांगत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com