मुख्यमंत्र्यांच्या वडिलांना 15 दिवसांची कोठडी अन् वकिलांनी केला गौप्यस्फोट

मुख्यमंत्र्यांनीही वडिलांना कायदेशीर कारवाई सामोरे जावे लागेल, असे संकेत दिले होते.
CM Bhupesh Baghels father has been sent to judicial custody
CM Bhupesh Baghels father has been sent to judicial custody

रायपूर : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांचे वडील नंद कुमार बघेल (Nand Kumar Baghel) यांना न्यायालयानं 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रायपूर पोलिसांनी त्यांना सकाळीच दिल्लीतून अटक केली होती. कोठडी सुनावल्यानंतर नंद कुमार बघेल यांच्या वकिलांनी त्यांच्या जामीनाबाबत गौप्यस्फोट केला आहे. (CM Bhupesh Baghels father has been sent to judicial custody)

उत्तर प्रदेशात ब्राम्हण समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नंदकुमार बघेल यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्र्यांनीही वडिलांना कायदेशीर कारवाई सामोरे जावे लागेल, असे संकेत दिले होते. त्यानंतर रायपूर पोलिसांनी मंगळवारी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयानं त्यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. 

नंद कुमार बघेल हे मुख्यमंत्र्यांचे वडील आहेत. तसेच ते 86 वर्षांचे आहेत. त्यामुळं त्यांना न्यायालयाकडून जामीन मिळू शकतो, अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात त्यांच्या वकिलांनी जामीनासाठी अर्जच केला नसल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयीन कामकाजानंतर माध्यमांशी बोलताना त्यांचे वकिल गजेंद्र सोनकर यांनीच ही माहिती दिली. नंद कुमार बघेल यांच्या सुचनेनुसारच जामीन अर्ज दाखल केला नाही, असा दावा त्यांनी केला आहे. 

जामीनासाठी अर्ज न करण्यास नंदकुमार बघेल यांनीच सांगितल्याने त्यावरून पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यांनी जाणीवपूर्वक हा निर्णय घेतल्याचे दिसून येते. यामागे कोणते राजकीय गणित आहे, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बघेल यांनी वडिलांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही, मग ते माझे 86 वर्षांचे वडील असले तरी. या वक्तव्यानं मीही निराश झालो आहे, असं मुख्यमंत्री बघेल यांनी सांगितलं होतं.

आम्हा दोघांचे राजकीय विचार खूपच वेगळे आहेत. मी मुलगा म्हणून त्यांचा नेहमीच आदर करतो. पण मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या चुकीवर पदडा टाकणार नाही. त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होईल, असंही बघेल यांनी स्पष्ट केलं आहे. नंद कुमार बघेल यांच्या वक्तव्यावरून समाजाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात छत्तीसगढमध्ये आंदोलनही करण्यात आले. त्यानंतर रायपूरमधील डीडी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री व त्यांच्या वडिलांमध्ये सुरूवातीपासूनच वैचारिक मतभेद असल्याची चर्चाही छत्तीसगडमध्ये आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com