निवडणुकीआधी नेत्यांना पक्षात घेण्यात नेतृत्वाची चूक; भाजप आमदाराचा घरचा आहेर

आता भाजपमधीलच वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. एका आमदाराने थेट पक्ष नेतृत्वावरच आरोप केले आहेत.
BJP MLA criticized parties leaders decision to include TMC Leaders
BJP MLA criticized parties leaders decision to include TMC Leaders

कोलकाता : पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर भाजपला गळती लागली आहे. आतापर्यंत चार आमदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं भाजपला मोठा धक्का बसला आहे. तसेच आणखी काही आमदार तृणमूलच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यावरून आता भाजपमधीलच वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. एका आमदाराने थेट पक्ष नेतृत्वावरच आरोप केले आहेत. (BJP MLA criticized parties leaders decision to include TMC Leaders)

विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूलमधील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात पक्षाच्या नेतृत्वाने मोठी चूक केल्याचं कूच बिहार दक्षिणचे आमदार निखिल रंजन डे (Nikhil Ranjan De) यांनी म्हटलं आहे. डे यांनी उघडपणे वक्तव्य केल्यानं भाजप नेतेही सतर्क झाले आहेत. तृणमूलच्या नेत्यांना प्रवेश दिला नसता तर भाजपनं निवडणुकीत आणखी चांगलं यश मिळवलं असतं. भाजपात आलेले आमदार कधीच भाजपच्या विचारधारेशी जोडले गेले नव्हते, असंही डे म्हणाले आहेत. 

तृणमूलचे नेते भाजपमध्ये आले तेव्हा त्यांना पक्षाची सत्ता येईल असं वाटलं होतं. या नेत्यांना भाजपमध्ये अधिक महत्वही देण्यात आलं. पण आता ते पक्ष सोडून जात आहेत, असा दावा डे यांनी केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एकहाती सत्ता मिळवल्यानंतर भाजपला गळती लागली आहे. निवडणुकीनंतर आतापर्यंत चार आमदारांनी भाजपला सोडचिठ्ठी देत घरवापसी केली आहे. आता आणखी 25 आमदार रांगेत असल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांचे भाचे व खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी केला आहे. 

अभिषेक बॅनर्जी यांना कोळसा घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालय ईडीने नोटीस बजावली होती. त्यानुसार ते सोमवारी नवी दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात सामोरे गेले. चौकशीनंतर कार्यालयाबाहेर येताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजपविरोधात दंड थोपटले. भाजपमधील 25 आमदार तृणमूल काँग्रेसमध्ये येण्यासाठी रांगेत आहेत. पण आम्हीच पक्षात घेत नाही, असं बॅनर्जी म्हणाले आहेत. 

राजकीय मैदानात ते आम्हाला हरवू शकत नाहीत. आम्ही त्यांना 2024 च्या निवडणुकीत पराभूत करू. भाजपची सत्ता असलेल्या प्रत्येक राज्यात पक्ष पोहचेल. पक्षाला थांबवण्याची कुणाला इच्छा असल्यास मी त्यांना आव्हान देतो. तुम्ही सीबीआय, ईडी, आयकर विभाग आणि अन्य कोणत्याही यंत्रणेचा वापर करा. आम्ही खाली झुकणार नाही. आता थांबणार नाही, असं खुलं आव्हान अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपला दिलं. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com