मुख्यमंत्री बनण्यासाठी त्यांनी माझ्यावर हल्ला केला..काँग्रेस आमदाराचा आरोप

माझी हत्या केल्यानंतर ते मुख्यमंत्री होऊ शकत असतील, तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत.
Copy of Sarkarnama Banner (9).jpg
Copy of Sarkarnama Banner (9).jpg

रायपुर: छत्तीसगडमधील काँग्रेसचे chhattisgarh congress आमदार बृहस्पति सिंह यांच्यावरील हल्ल्यामुळे छत्तीसगडमधील राजकारण चांगलच तापलं आहे. त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर १५ ते २० आमदारांनी त्यांची भेट घेतली. काँग्रेस आमदारांच्या बैठकीपूर्वी हे आमदार बृहस्पति सिंह यांच्या घरी पोहचले. बृहस्पति सिंह brihaspati singh यांच्यावर शनिवारी हल्ला झाला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या पक्षातील मंत्र्यावर गंभीर आरोप केला आहे. 

बृहस्पति सिंह म्हणाले की, माझ्यावर जो हल्ला झाला त्यामागे आरोग्यमंत्री टी. एस. सिंहदेव यांच्या हात आहे. त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. ते महाराज आहेत ते माझी हत्या करु शकतात. माझी हत्या केल्यानंतर ते मुख्यमंत्री होऊ शकत असतील, तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. मंत्री सिंहदेव काँग्रेसच्या आमदारांचा अपमान करीत असतात. याची तक्रार मी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याकडे करणार आहे. 

आज विधानसभेचे अधिवेशन सुरु होत आहे. आरोग्यमंत्री सिंहदेव यांनी या आरोपाचे खंडन केले आहे. ''बृहस्पति सिंह यांनी हे विधान भावनेच्या भरात असे विधान केलं आहे. याबाबत मी चर्चा करणार आहे, '' असे सिंहदेव यांनी सांगितले. अंबिकापूर विधानसभेचे आमदार बृहस्पति सिंह यांच्या कारवर एका युवकाने हल्ला करुन त्यांच्या कारची काच फोडली होती. त्याने सुरक्षारक्षकांना शिवीगाळ केली होती. 

माजी आमदार माणिकराव जगताप यांचे निधन
मुंबई :  माजी आमदार माणिकराव जगताप (वय५४)  Manikrao Jagtap यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष होते.  सध्या रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com