माजी आमदार माणिकराव जगताप यांचे निधन

महाड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
Copy of Sarkarnama Banner (8).jpg
Copy of Sarkarnama Banner (8).jpg

मुंबई :  माजी आमदार माणिकराव जगताप (वय५४)  Manikrao Jagtap यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष होते.  सध्या रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर होती.  Manikrao Jagtap died due to Corona in Mumbai

मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू असताना  काल मध्यरात्री अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली.आज दुपारी 2 वाजता महाड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन त्यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. कर्तृत्ववान आणि उमदे नेतृत्व गमावल्याच्या भावना  कॉंग्रेसने व्यक्त केली आहे.  

माणिकराव जगताप हे काँग्रेसचे विद्यमान रायगड जिल्हा अध्यक्ष होते. महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी याआधी आमदारकी भूषवली होती. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत ते महाड विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची धुराही त्यांच्या खांद्यावर होती. आज दुपारी 2 वाजता महाड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

आपल्या राजकीय कारकिर्दीला विद्यार्थी काँग्रेसमधून त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर युवक काँग्रेसमध्ये अनेक पदे भूषवली. 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत ते महाड विधान सभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते.  

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ते विद्यमान उपाध्यक्ष होते. सध्या रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर होती. रायगड जिल्ह्यामध्ये सुनिल तटकरे यांच्या वर्चस्वाला थेट आव्हान करणारे एकमेव राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळख जगताप यांची ओळख होती. 

मुंबई : राज्याला महापुराचा फटका बसला आहे. अनेकांचे घरे, दुकाने उद्धस्थ झाले आहेत. या पुरस्थितीनं सगळ्यानं हादररुन सोडलं आहे. या परिस्थितीवर शिवसेनेचे मुखपत्र सामनातून भाष्य करण्यात आले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com