भाजप खासदाराच्या पित्याची मोटार घराबाहेरुनच चोरीला

दिल्लीतील चोरांनी भाजपचे खासदार व माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांच्या पित्याची आलिशान मोटार घराबाहेरुन चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या हायप्रोफाईल चोरीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
bjp mp gautam gambhirs fathers suv stolen from outside home
bjp mp gautam gambhirs fathers suv stolen from outside home

नवी दिल्ली : खासदार गौतम गंभीर यांचे पिता मध्य दिल्लीतील राजिंदर नगरमध्ये राहतात. त्यांच्या घराबाहेरुन चोरट्यांनी एसयूव्ही चोरून नेली, अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. गौतम गंभीर हे मागील वर्षी पूर्व दिल्लीतून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आले होते. ते त्यांच्या वडिलांसमवेत राहतात. 

गौतम यांचे पिता दीपक यांनी गंभीर यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यांची टोयोटा फॉर्च्युनर मोटार चोरीला गेल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. ही मोटार त्यांनी घरासमोर पहाटे 3.30 च्या सुमारास लावलेली होती. सकाळी उठून पाहिले असता मोटार चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याविषयी बोलताना पोलिस उपायुक्त संजय भाटिया म्हणाले की, मोटारीची चोरी झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज आम्ही तपासत आहोत. यातून चोरट्यांचा शोध घेऊन ते कोणत्या दिशेला गेले हे तपासण्यात येईल. 

चार मिनिटांत मोटार पळविली 

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्हा फुटेजमध्ये चोरटे इनोव्हा मोटारीमधून आल्याचे दिसत आहे. ते गंभीर यांच्या घरासमोर केवळ चार मिनिटे थांबले आणि फॉर्च्युनर घेऊन पसार झाले. 

पोलिसांची डोकेदुखी वाढली 

सध्या लॉकडाउनमुळे दिल्लीत संध्याकाळी 7 ते सकाळी सात संचारबंदी आहे. याचबरोबर शहरात अनेक ठिकाणी कडेकोट बंदोबस्त आहे. या परिस्थितीत झालेल्या हायप्रोफाईल चोरीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. 

मुंबई : कोविड-19 आणि त्याचा संसर्ग रोखण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत देशाचे एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) 40 टक्‍क्‍यांनी घटण्याची शक्‍यता आहे, असे स्टेट बॅंकेच्या इकोरॅप अहवालात म्हटले आहे. कोविड-19 मुळे एकूण राज्यांतर्गत उत्पादनात (जीएसडीपी) राज्यांचे 30.3 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. जे एकूण जीएसडीपीच्या 13.5 टक्के आहे. आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीमध्ये जीडीपीचा दर उणे 40 टक्‍क्‍यांवर जाण्याची शक्‍यता आहे.

नवी दिल्ली : जगभरात लॉकडाउन शिथिल करण्यात येत असल्याने इंधनाच्या मागणीत वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही इंधनाच्या किंमती वधारल्या आहेत. त्याचा परिणाम देशातील इंधनाच्या किंमतीवर होण्याची शक्‍यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रतिलिटर 4 ते 5 रुपयांनी वाढ होण्याची शक्‍यता आहे. येत्या आठवड्यात इंधन दरवाढ होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि पेट्रोल विक्रेत्यांची नुकताच एक बैठक पार पडली. यात कोरोना आणि लॉकडाउनमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. बैठकीत येत्या जूनपासून तेलाच्या किमतीचा दैनंदिन आढावा घेण्याचे ठरविण्यात आले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com