कोरोनामुळे राज्ये गमावणार 30 लाख कोटी 

कोविड-19 आणि त्याचा संसर्ग रोखण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत देशाचे एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) 40 टक्‍क्‍यांनी घटण्याची शक्‍यता आहे, असे स्टेट बॅंकेच्या इकोरॅप अहवालात म्हटले आहे.
 States to lose Rs 30 lakh crore due to corona
States to lose Rs 30 lakh crore due to corona

मुंबई : कोविड-19 आणि त्याचा संसर्ग रोखण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत देशाचे एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) 40 टक्‍क्‍यांनी घटण्याची शक्‍यता आहे, असे स्टेट बॅंकेच्या इकोरॅप अहवालात म्हटले आहे. 

कोविड-19 मुळे एकूण राज्यांतर्गत उत्पादनात (जीएसडीपी) राज्यांचे 30.3 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. जे एकूण जीएसडीपीच्या 13.5 टक्के आहे. 

आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीमध्ये जीडीपीचा दर उणे 40 टक्‍क्‍यांवर जाण्याची शक्‍यता आहे. मात्र दुसऱ्या तिमाहीत त्यात जोरदार सुधारणा होत जीडीपीचा दर 7.1 टक्‍क्‍यांवर पोचण्याची शक्‍यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, या दरम्यान मागणी टिकून राहिल्यास जीडीपीमध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे. 

आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये अखेरच्या तिमाहीत विकासदर 1.5 टक्‍क्‍यांपेक्षा कमी राहण्याची शक्‍यता आहे. चौथ्या तिमाहीत विकासदर 1.2 टक्के राहण्याची शक्‍यता आहे. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये विकासदर 4.2 टक्के राहण्याची शक्‍यता आहे. एसबीआय इकोरॅप अहवालानुसार, अर्थव्यवस्थेचा वास्तव जीडीपीचा दर उणे 6.8 टक्‍क्‍यांपर्यंत खाली येण्याची शक्‍यता आहे. 

राज्यांमध्ये सर्वाधिक 50 टक्के नुकसान "रेड झोन'मध्ये झाले आहे. देशातील महत्त्वाचे औद्योगिक क्षेत्र "रेड झोन'मध्ये आल्याने उत्पादन आणि सेवांवर परिणाम झाला आहे. "ऑरेंज झोन' आणि "रेड झोन'मध्ये मिळून सुमारे 90 टक्के नुकसान झाले आहे. "ग्रीन झोन'मध्ये अत्यल्प नुकसान झाले आहे. "ग्रीन झोन'मध्ये बहुतांश ग्रामीण भागाचा समावेश असून तेथील सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. 
 

राज्यांवर वाढणार कर्जाचा भार 

स्टेट बॅंकेच्या इकोरॅप अहवालानुसार, राज्यांच्या डोक्‍यावर कर्जाचा भार वाढण्याची शक्‍यता आहे. राज्यांवरील कर्जाचा डोंगर 6.09 लाख कोटींवरून वाढून 8.25 लाख कोटींवर पोचण्याची शक्‍यता आहे. शिवाय यामुळे राज्यांच्या वित्तीय तुटीमध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे. केंद्र सरकारने राज्यांच्या कर्जाची मर्यादा वाढविली आहे. ती आता जीएसडीपीच्या 5 टक्के केली आहे. आत्मनिर्भर भारत पॅकेज घोषणेच्या वेळी ही मर्यादा वाढविण्यात आली होती. 
 

जूनमध्ये कोरोना संसर्गाचा उद्रेक 

दरम्यान, देशात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा उद्रेक होण्याची शक्‍यता आहे. नवीन संसर्ग झालेल्या आकडेवारीच्या आधारे काढलेल्या सात दिवसांच्या सरासरीनुसार, जून महिन्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक होण्याची शक्‍यता आहे. जूनच्या अखेरच्या आठवड्यात कोरोनाबधित रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ होण्याची शक्‍यता आहे. येत्या सप्टेंबरमध्ये रुग्णांच्या संख्येत पुन्हा घट होण्याची शक्‍यता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com