actor sonu sood arilifts 117 girls stranded in kerala | Sarkarnama

ओडिशातील 117 मुलींसाठी या अभिनेत्याने पाठविले विशेष विमान

वृत्तसंस्था
शुक्रवार, 29 मे 2020

अभिनेता सोनू सूद स्थलांतरित मजुरांच्या मदतीला धावून गेल्यानंतर त्याच्याकडे अनेक जण मदतीसाठी याचना करीत आहेत. त्याने केरळमध्ये अडकलेल्या ओडिशातील 117 मुलींना विशेष विमानाने त्यांच्या घरी पाठविले आहे. 

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे ओडिशातील 117 मुली केरळमध्ये अडकल्या होत्या. भुवनेश्वरमधील एका मित्राकडून सोनू सूदला याची माहिती मिळाली. त्याने या मुलींना मदत करण्याचा निर्णय घेतला. या मुलींसाठी त्याने विशेष विमानाची व्यवस्था करुन त्यांनी घरी पोचविले. 

सोनू सूद याने यासाठी कोची आणि भुवनेश्वर ही विमानतळे सुरू ठेवण्यासाठी दोन्ही राज्यांकडून अनेक परवानग्या काढल्या. त्यानंतर बंगळूरमधून एक विशेष विमान बोलाविण्यात आले. हे विमान कोचीला गेले. कोचीतून 117 मुलींना घेऊन अखेर भुवनेश्वरमध्ये या मुली त्यांच्या कुटुंबापर्यंत पोचल्या. 

हे देखील वाचा : भाजप खासदाराच्या पित्याची मोटार घराबाहेरूनच चोरीला 

सोनू सूद आणि त्याची मैत्रीण नीती गोयल यांनी यासाठी 'घर भेजो' मोहीम सुरू केली आहे. सूद याचे या मोहिमेबद्दल अनेकांनी कौतुक केले आहे. मुबंईमध्ये अडकलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी सूद याने अनेक बसची व्यवस्था केली होती. याचबरोबर कर्नाटक, बिहार, झारखंड आणि मध्य प्रदेशातील स्थलांतरित कामगारांनी या मोहिमेअंतर्गत घरी पोचविण्यात आले आहे. 

बिहारी तरुणासाठी सोनू सूद ठरला ‘देव’

चित्रपटात नाव कमवण्याचे स्वप्न उराशी बाळगत बिहारमधील सहरसा गावातील मनीष मुंबईत काम शोधण्यासाठी आला होता. या काळात कोरोनाव्हायरसचा प्रसार देशात सुरु झाला आणि लॉकडाउन जाहीर झाले. मुंबईत कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने आपल्यालाही संसर्ग होईल आणि आपले स्वप्न अपूर्ण राहिल, अशी भीती त्याला वाटत होती. घरी आई त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. मनीषने महाराष्ट्र, बिहार सरकारसह पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि रेल्वेमंत्री या सर्वांना ट्विट करून घरी जाण्यासाठी व्यवस्था करण्याची विनंती केली. ऑनलाइन अर्जही भरला, पण कोठूनही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. 

दीड महिना काहीही काम नसल्याने मनीषकडील पैसेही संपले होते. सॅनिटायझर विकत घेण्यासाठीही पैसे उरले नाही. तो मुंबईत ज्या भागात राहत होता, तेथे बिहारमधील खूप लोक राहतात. त्या सर्वांची स्‍थिती मनीषपेक्षा वेगळी नव्हती. अशा अवस्थेत त्याने सोनू सूदला ट्विट करून ‘बिहारला घरी जायचे आहे. आई वाट पाहत आहे. तुम्ही काही तरी करु शकाल का?,’ अशी विचारणा केली. सोनूने ट्विटला त्वरित उत्तर देत फोन क्रमांक घेतला. त्यावर संपर्क साधून त्याने मनीषला धीर दिला. दुसऱ्यांदा मनीषने ट्विट केल्यानंतर ‘चल भाई, मी तुला तुझ्या घरी सोडून येतो,’ असा दिलासा देत सोनूने विशेष परवानगी घेऊन मनीषसारख्या अडकलेल्या सर्वांना बिहारला जाण्यासाठी बसची व्यवस्था केली व खाण्या-पिण्याची सोयही केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख