लवकरच जन्म घेईन, आता हरलोय! अशी फेसबुक पोस्ट लिहिलेल्या अभिनेत्याचा कोरोनामुळं मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनाही फेसबुक पोस्टमध्येटॅग केले आहे.
Actor Rahul Vohra dies due to corona after seeking help on facebook
Actor Rahul Vohra dies due to corona after seeking help on facebook

नवी दिल्ली : फेसबुकवरून चांगल्या उपचारांसाठी मदतीची मागणी करणारा अभिनेता राहुल व्होराची कोरोनाशी झुंज आज संपली. 'लवकरच जन्म घेईन आणि चांगले काम करेन. आता हिंमत हरलो आहे,' अशी पोस्ट त्याने शनिवारीच केली होती. त्यामध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनाही टॅग केले आहे. (Actor Rahul Vohra dies due to corona after seeking help on facebook)

राहुल व्होरा हा मुळचा उत्तराखंड राज्यातील असून प्रसिध्द अभिनेता आहे. अनेक नाटकांमध्ये त्याने भूमिका केल्या आहेत. सध्या तो डिजिटल प्लॅटफॅार्मवर सक्रीय होता. ३५ वर्षांच्या राहुलने अनेक वेब सिरीजमध्ये काम केले आहे. काही दिवसांपूर्वीच त्याला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्याच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्याचा मृत्यू झाला. दिग्दर्शक अरविंद गौड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. 

राहुलने चार मे रोजी फेसबुकवर पोस्ट टाकून कोरोना पॅाझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. 'चार दिवसांपासून रुग्णालयात आहे. पण काहीच सुधारणा होत नाही. मला कुठे अॅाक्सीजन बेड मिळेल का? कारण माझी अॅाक्सीजन पातळी खालावत चालली आहे. इथे पाहायला कुणी नाही. मी हतबल झाल्यामुळे हे लिहित आहे,' अशी पोस्ट राहुलने टाकली होती. 

या पोस्टनंतर शनिवारी टाकलेल्या पोस्टमध्ये त्याने आपण हिंमत हरलो असल्याचे म्हटले होते. 'मला चांगले उपचार मिळाले असते तर मी वाचलो असतो. लवकरच जन्म घेईन आणि चांगले काम करेन. आता हिंमत हरलो आहे,' असे त्याने पोस्टमध्ये म्हटले होते. याच पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी आणि मनिष सिसोदिया यांना टॅग केले आहे. दिल्लीतील राजीव गांधी सुपरस्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहितीही त्याने या पोस्टमध्ये दिली होती. 

कोरोनाला रोखण्याऐवजी ते ट्विटरवर व्यस्त होते; 'लॅन्सेट'ने मोदी सरकारला झोडपलं

देशातील कोरोनाचा वाढता कहर जगाच्या चिंतेचा मुद्दा बनला आहे. जगभरातील तज्ज्ञांनी भारतातील कोरोना विस्फोटामागे येथील निष्काळजीपणाला दोष दिला आहे. 'लॅन्सेट' या आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय संशोधन नियतकालिकाने थेट मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार कोरोनाच्या महामारीला नियंत्रणात आणण्याऐवजी ट्विटरवर होणाऱ्या टीकाकारांना रोखण्यात व्यस्त होते, अशी टीका 'लॅन्सेट'मध्ये करण्यात आली आहे. 

लॅन्सेटमध्ये भारतातील कोरोना महामारीचा लेखाजोखा प्रसिध्द करण्यात आला आहे. यामध्ये थेट मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करण्यात आली आहे. भारतात दररोज सरासरी ३ लाख ७८ नवे रुग्ण आढळून येत आहेत. तर ४ मेपर्यंत २ लाख २२ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयांमध्ये जागा नसून कर्मचाऱ्यांवरील ताण प्रचंड वाढला आहे. भारतात मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येत असताना केंद्रीय आरोग्य मंत्री डॅा. हर्ष वर्धन यांनी महामारी संपत असल्याची घोषणा केली. दुसरी लाट आणि कोरोनाच्या नवीन प्रकारांचा धोका लक्षात घेतला नाही. भारतात सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचा चुकीचा दावा करण्यात आला, असे 'लॅन्सेट'मध्ये म्हटलं आहे.

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com