भाजपचं ठरलं : आसामच्या मुख्यंमत्रीपदी हेमंत बिस्वा सरमा  - Himanta Biswa sarma is assams news chief minister | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपचं ठरलं : आसामच्या मुख्यंमत्रीपदी हेमंत बिस्वा सरमा 

वृत्तसंस्था
रविवार, 9 मे 2021

सर्वांनंद  सोनोवाल आणि हेमंत बिस्वा सर्मा यांच्यात सीएम पदावरून रस्सीखेच सुरू होती.

गुवाहाटी : आसाम विधानसभा  निवडणुकीच्या निकालानंतर आठवडभराने भाजपकडून मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सात दिवसांच्या बैठकांनंतर अखेर हेमंत बिस्वा सरमा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सध्याचे मुख्यमंत्री सर्वानंत सोनोवाल यांची जागा सरमा घेतील. (Himanta Biswa Sarma is Assams news Chief Minister)

भाजपने निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्रीपदी कोण असेल, हे जाहीर केले नव्हते. इतर राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला तरी भाजपकडून नाव निश्चित होत नसल्याने संभ्रम वाढत चालला होता. एकट्या भाजपला निवडणुकीत ६० जागा मिळाल्या आहेत. निवडणुकीचा निकाल २ तारखेला जाहीर झाला आहे. आठवडा उलटून गेल्या तरी कालपर्यंत केवळ बैठकाच सुरू होत्या. 

हेही वाचा : भारतात कोरोनाचा विस्फोट का झाला? WHO च्या सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले कारण...

भाजपने बहुमत मिळवून दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करीत आहेत. आसामचे मुख्यमंत्री  सर्वांनंद  सोनोवाल आणि आरोग्य मंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांच्यात सीएम पदावरून रस्सीखेच सुरू होती. गृहमंत्री अमित शाह, भाजपचे  अध्यक्ष  जे.पी. नड्डा, भाजप संघटन महासचिव बिएल  संतोष यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांमध्ये आसामच्या मुख्यमंत्री पदाबाबत  चर्चा  झाली. दिल्लीत अनेकदा बैठका झाल्यानंतर नवा निश्चित होऊ शकले नव्हते. 

आज सकाळी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. या बैठकीत हेमंत बिस्वा सरमा यांचे नाव निश्चित करण्यात आले. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सरमा यांच्या नावाची घोषणा केली. तत्पुर्वी सर्वानंद सोनोवाल यांनी राज्यपाल जगदीश मुखी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला.

दरम्यान, आसाममध्ये भाजपला सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळाली आहे. भाजपने १२६ जागांपैकी ६० तर सहयोगी पक्ष असलेल्या आसाम गण परिषदेने नऊ आणि पिपल्स पार्टी लिबरलने सहा जागांवर विजय मिळवत बहूमत संपादन केले आहे. या निवडणुकीत काँग्रेसनेही जोरदार प्रचार केला होता. पण अखेर भाजपने सत्ता राखण्यात यश मिळवले. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख